डेल्टा प्लसला कसे रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:02 AM2021-08-12T04:02:07+5:302021-08-12T04:02:07+5:30

कोरोनाची भीती झाली कमी : मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष; कारवाईचे प्रमाणही झाले कमी संतोष हिरेमठ औरंगाबाद : औरंगाबादेत डेल्टा प्लस ...

How to stop Delta Plus? | डेल्टा प्लसला कसे रोखणार?

डेल्टा प्लसला कसे रोखणार?

googlenewsNext

कोरोनाची भीती झाली कमी : मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष; कारवाईचे प्रमाणही झाले कमी

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : औरंगाबादेत डेल्टा प्लस व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. पहिला रुग्ण उपचार घेऊन ठणठणीत झाला आहे; परंतु संकट अजूनही टळलेले नाही. मात्र, क्रांती चौकातील वाहतूक सिग्नलवर १५ वाहनचालकांपैकी ८ वाहनचालक विनामास्क, तर दोघांचा मास्क हनुवटीला असल्याची धक्कादायक बाब मंगळवारी ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये आढळले. त्यामुळे डेल्टा प्लसला कसे रोखणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

------

मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईही नाही

- वाहतूक सिग्नल लागल्यानंतर वाहनांच्या गर्दीत अनेक जण विनामास्क असल्याचे आढळून येते. मात्र, कोणावरही कारवाई होताना दिसत नाही.

- समोर वाहतूक पोलीस उभे असतानाही मानेखालचा, हनुवटीवरचा मास्क तोंडावर घेण्याचीही खबरदारी कोणी घेत नसल्याची स्थिती आहे.

- छायाचित्र घेण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक वाहनचालकांनी मास्क लावण्यावर भर दिला. पोलिसांनी लागलीच कारवाई सुरू केली.

----

पोलिसांचाही मास्क तोंडाखाली

- क्रांती चौकासह शहरातील अनेक चौकांत वाहतूक पोलिसांचाही मास्क तोंडाखाली पहायाला मिळाला.

- विनामास्क वाहनचालकांचे छायाचित्र घेण्यास सुरुवात केल्यानंतर वाहतूक पोलिसांनीही मास्क वर केला.

- गस्तीवर असलेल्या वाहनांतील पोलिसांचाही मास्क मानेखाली पहायला मिळला.

----

विनामास्क वाहनचालकांवर कारवाई सुरूच

विनामास्क आढळणाऱ्या वाहनाचलकांवर वाहतूक पोलिसांकडून तसेच नाकाबंदीदरम्यान नियमित दंडात्मक कारवाई केली जाते. कारवाईमध्ये ढिलाई देण्यात आली नाही. नागरिकांनी कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमावलीचे तंतोत पालन करावे.

- रवींद्र साळोखे, सहाय्यक पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर

-----

लसीकरणाची गती वाढण्याचे नाव घेईना...

वयोगट-

१८-४४

पहिला-३,४५,३५९

दुसरा-२४,९१७

--

४५-५९

पहिला- २,५५,७०७

दुसरा-१,४१,०५४

---

६० वर्षांवरील

पहिला-१,७६,६३४

दुसरा-९०,५७१

-------

फोटो ओळ..

क्रांती चाैकातील सिग्नलवर अशाप्रकारे अनेक वाहनचालक विनामास्क पहायला मिळाले.

Web Title: How to stop Delta Plus?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.