विना प्रिस्क्रीप्शन 'बटन' मिळतेच कसे? राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा सवाल
By विकास राऊत | Published: August 26, 2022 07:20 PM2022-08-26T19:20:07+5:302022-08-26T19:21:02+5:30
राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने अन्न व औषधी प्रशासनाच्या कारभारवर ठपका
औरंगाबाद: शहर व परिसरात 'बटन' (नायट्रोसेन) च्या गोळ्यांची विना प्रिस्क्रीप्शन विक्री सुरू असून यावर नियंत्रण मिळविणे हे आव्हान आहे. यावर राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने अन्न व औषधी प्रशासनाच्या कारभारवर ठपका ठेवत विना प्रिस्क्रीप्शन त्या गोळ्या मिळतातच, कशा असा सवाल केला. आयोगाच्या अध्यक्षा सुशीलाबेन शहा व सदस्यांनी शुक्रवारी दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
अध्यक्षा शहा म्हणाल्या, दोन वर्षांपासून आयोग गठीत नव्हता. त्यामुळे अनेक विषयांची माहिती, कारवाई, नियंत्रण झालेले नाही. नायट्रोसेन ही औषधी असून त्याचा खप मोठा आहे. परंतु ही औषधी घेणार्यांचा डेटा मेडीकल स्टोअर्समध्ये असला पाहिजे. कुणी येणार आणि ती औषधी मेडिकलमधून घेत असेल तर हे योग्य नाही. 'बटन' बाबत होणाऱ्या कारवाया जाणून घेण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन उपायुक्तांना आज बोलावून घेतले होते. त्यांनी १२ ठिकाणी छापे मारल्याचे सांगितले. ६ हजार मेडीकल स्टोअर्स शहर व परिसरात असून ५ इन्सपेक्टवर त्याची जबाबदारी आहे. अशी माहिती एफडीएने दिल्याने शहा यांनी सांगितले.