प्रचंड भाववाढ! खिसा गरम असेल तरच वार्षिक धान्य खरेदीस जा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 02:14 PM2022-04-06T14:14:58+5:302022-04-06T14:15:56+5:30

यंदा मागील वर्षीच्या तुलनेत धान्य, तांदळाचे भाव वाढले आहेत. यामुळे तुम्हाला बजेटही वाढवावे लागणार आहे.

Huge inflation! Only buy groceries annually if the pocket is filled | प्रचंड भाववाढ! खिसा गरम असेल तरच वार्षिक धान्य खरेदीस जा

प्रचंड भाववाढ! खिसा गरम असेल तरच वार्षिक धान्य खरेदीस जा

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद :
काय तुम्ही वार्षिक धान्य खरेदी करण्याचा विचार करीत आहात..? मग जरा थांबा. कारण, यंदा मागील वर्षीच्या तुलनेत धान्य, तांदळाचे भाव वाढले आहेत. यामुळे तुम्हाला बजेटही वाढवावे लागणार आहे. खिसा गरम ठेवूनच तुम्हाला धान्य खरेदीसाठी जावे लागेल.

मध्य प्रदेश-राजस्थानचा नवीन गहू बाजारात
औरंगाबाद जिल्ह्यात एकूण विक्री होणाऱ्या गव्हापैकी ६०-७० टक्के गहू मध्य प्रदेशातील असतो. मध्य प्रदेशचा मिनी शरबती २६०० ते ३१०० रुपये, राजस्थानचा गहू २७०० ते २८०० रुपये, तर जिल्ह्यातील गहू २४७५ ते २६०० रु. क्विंटलने खरेदी करावा लागत आहे. गुजरातमधील गहू मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने त्याची आवक नाही. म.प्र.मधील शरबती गहू येण्यास आणखी दहा दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

ज्वारीच्या भावात तीन वर्षातील उच्चांक
यंदा ज्वारीचे उत्पादन कमी झाल्याने भावात मागील तीन वर्षातील उच्चांक गाठला आहे. दगडी, मालदांडी ज्वारी ३००० रु. ते ३८०० रुपये क्विंटल विकत आहे.

काली मूँछ, बासमती बजेटबाहेर
काली मूँछ व बासमतीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. काली मूँछ क्विंटलमागे एक हजार रुपयांनी महागून ४००० ते ५३०० रुपयांपर्यंत भाव आहेत. शुद्ध बासमती ५००० ते १२,००० रु. आहे. याची निर्यात होत असल्याने मागील पाच वर्षातील भाववाढीचा विक्रम मोडीत निघाला आहे.

मठ डाळीत भाववाढीचा विक्रम
यंदा राजस्थानात मठाचे उत्पादन घटले आहे. परिणामी, मठ डाळीतील भाववाढीने मागील पाच वर्षाचा विक्रम मोडला आहे. एरव्ही ७० ते ७५ रु. किलोने विक्री होणारी मठ डाळ ११४ ते १२० रु. विकत आहे.

वार्षिक धान्य खरेदीसाठी योग्य काळ
धान्य खरेदी केल्यानंतर त्यास एकदा कडक उन्हात वाळवावे लागते. म्हणजे धान्यास कीड लागत नाही. सध्या तापमान वाढलेले आहे. धान्याचे भाव आणखी वाढतील. यामुळे सध्या धान्य खरेदीसाठी योग्य काळ आहे.
- नीलेश सोमाणी, होलसेल, व्यापारी

गव्हाच्या किमती
प्रकार भाव (प्रतिक्विंटल)

स्थानिक गहू २४७५ ते २६०० रु.
मध्य प्रदेश गहू २६०० ते ३१०० रु.
प्युअर शरबती ४२०० ते ४५०० रु.
गुजरात गहू २७०० ते २८०० रु.
ज्वारी ३००० ते ३८०० रु.

डाळीच्या किमती
तूर डाळ ८६०० ते ९३०० रु.
मठ डाळ ११,४०० ते १२,००० रु.
हरभरा डाळ ६००० ते ६५०० रु.
उडीद डाळ ८९०० ते ९५०० रु.
मूग डाळ ९००० ते ९८०० रु.

तांदळाच्या किमती
सुगंधी चिन्नोर ३४०० ते ३६०० रु.
काली मूँछ ४००० ते ५३०० रु.
कोलम ४८०० ते ५१०० रु.
अंबेमोहर ६५०० ते ७६०० रु.
बासमती ५००० ते १२,००० रु.

Web Title: Huge inflation! Only buy groceries annually if the pocket is filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.