अवकाळीने शेतीचे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई देण्याची जरांगेंची मागणी

By बापू सोळुंके | Published: November 29, 2023 07:03 PM2023-11-29T19:03:26+5:302023-11-29T19:04:01+5:30

सरकारने तत्काळ पंचनामे करून भरघोस नुकसान भरपाई द्यावी

huge loss of agriculture due to bad weather, Manoj Jarange's demand huge compensation to farmers | अवकाळीने शेतीचे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई देण्याची जरांगेंची मागणी

अवकाळीने शेतीचे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई देण्याची जरांगेंची मागणी

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजावर कोणी कितीही जळाले तरी मराठा समाजाची आरक्षणाची लढाई सुरूच राहणार आणि आम्हाला हे आरक्षण मिळणारच असा ठाम विश्वास मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.अशक्तपणा जाणवत असल्यामुळे तीन दिवसापासून येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता ठणठणीत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. यावेळी त्यांनी मी शेतकऱ्यांत जात बघणार नाही.अवकाळी पावसाने शेतीच खूप नुकसान झालं,सरकारने तत्काळ पंचनामे करून भरघोस नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही सरकारने केली.

यावेळी त्यांनी पत्रकारांनी संवाद साधला , जरांगे पाटील म्हणाले की, सत्तर वर्ष आरक्षणाची वाट पाहिल्यानंतरही समाज बांधवांनी आरक्षणाची आशा मावळली होती मात्र आता 32 हजार लोकांना आरक्षण मिळाल्याने ते उत्साहाने फुलांची उधळण करून स्वागत करत असतात. मी त्यांना बुलडोझरने फुलांची उधळण करू नका असे सांगतो,पण समाज माझ ऐकत नाही असे त्यांनी सांगितले. माजी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता जरांगे पाटील म्हणाले की, लोक कितीही जळले तरी काही फरक पडत नाही.जे स्वतःच्या मुलासाठी राजकारण करतात त्यांच्यावर कोण फुल उधळणार? त्यांच्यावर कुणी फुल उधळणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मराठा आरक्षणासाठी सबुरीचा सल्ला दिला याकडे त्यांचे लक्ष वेधले असतात जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही टिकणार दिलं किंवा आरक्षण टिकवलं त्यापेक्षा आमचं ओबीसीतील आरक्षण आम्हाला द्या. आम्हाला सबुरीचा सल्ला देण्यापेक्षा तुमच्या लोकांना थांबवा मग आम्ही सबुरीने घेऊ, असेही जरांगे म्हणाले. तसेच तुम्ही भुजबळ यांचा राजीनामा मागणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, मराठा समाजाला रोज ओबीसीमधून आरक्षण मिळत आहे.मात्र मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला काळीज लागत. भावना नीट नसलेल्यांना सल्ले देत नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

Web Title: huge loss of agriculture due to bad weather, Manoj Jarange's demand huge compensation to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.