नारायणाच्या ऑनलाईन सेमिनारला प्रचंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:05 AM2021-01-08T04:05:31+5:302021-01-08T04:05:31+5:30
औरंगाबाद : आजच्या शैक्षणिक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना जवळजवळ सर्वच सोयी उपलब्ध आहेत. याशिवाय पालकांना बदलांची पूर्ण जाणीव आहे. अशा प्रकारे ...
औरंगाबाद : आजच्या शैक्षणिक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना जवळजवळ सर्वच सोयी उपलब्ध आहेत. याशिवाय पालकांना बदलांची पूर्ण जाणीव आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्याने निवडलेल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये स्पर्धेचे जाळे दिसून येते. येथे प्रत्येकजणच उंच भरारीचे स्वप्न बघतो, पण फारच थोडे लोक स्वप्रयत्नांनी यशाचे शिखर गाठतात, असे मत नारायणाचे स्थानिक शाखेचे संचालक डॉ. एम. एफ. मल्लिक यांनी व्यक्त केले.
इयत्ता १० वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी नारायणा इन्स्टिट्यूने आयोजित केलेल्या ऑनलाईन सेमिनारमध्ये ते मार्गदर्शन करीत होते. या ऑनलाईन सेमिनारला विद्यार्थी आणि पालक यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील दोनवर्षीय अभ्यासक्रमाकरिता प्रवेशासाठी शिष्यवृती परीक्षा ७ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याचे प्रो विशाल लदनिया यांनी जाहीर केले. तसेच ६, ७, ८ वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन बॅच ७,८,९ करिता शिष्यवृती प्रवेश परीक्षा १० जानेवारीला होणार आहेत . शिष्यवृती परीक्षांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डी. आर. जाधव यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेतील सर्व प्राध्यापक हजार होते.