मनपाच्या नोकरभरतीसाठी ८ दिवसात ८१७ ऑनलाइन अर्ज, शेवटच्या तारखेची वाट पाहू नका!

By मुजीब देवणीकर | Published: August 30, 2023 11:46 AM2023-08-30T11:46:10+5:302023-08-30T11:47:41+5:30

आयबीपीएस कंपनीकडून परीक्षा घेतली जाणार आहे.

Huge response to Chhatrapati Sambhajinagar municipal recruitment; 817 online applications in 8 days | मनपाच्या नोकरभरतीसाठी ८ दिवसात ८१७ ऑनलाइन अर्ज, शेवटच्या तारखेची वाट पाहू नका!

मनपाच्या नोकरभरतीसाठी ८ दिवसात ८१७ ऑनलाइन अर्ज, शेवटच्या तारखेची वाट पाहू नका!

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने ११४ जागांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करताच इच्छुक उमेदवारांनी उदंड प्रतिसाद दिला. आठ दिवसांत तब्बल ८१७ उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केले. १२ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. राज्यातील सहा शहरांत परीक्षा घेतली जाणार असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले.

राज्य शासनाने महापालिकेतील १२५ पदे भरण्यास मंजुरी दिल्यानंतर शासन नियुक्त आयबीपीएस कंपनीसोबत सामंजस्य करार करून या कंपनीमार्फत ११४ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जाहिरातीचा मसुदा तयार करून त्यास मंजुरी देण्यात आली. २३ ऑगस्ट रोजी ११४ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहिरातीमधील अटी व शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत. १२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज आयबीपीएस कंपनीच्या पोर्टलवर स्वीकारण्यात येणार आहे. मंगळवारपर्यंत ८१७ अर्ज प्राप्त झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आयबीपीएस कंपनीकडून परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ही सहा परीक्षा केंद्रे असतील. कंपनीकडूनच गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. त्याच गुणवत्ता यादीनुसार पदांची भरती केली जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: Huge response to Chhatrapati Sambhajinagar municipal recruitment; 817 online applications in 8 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.