बीडमध्ये सकल राजस्थानी समाजाचा विशाल मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:49 AM2017-09-19T00:49:47+5:302017-09-19T00:49:47+5:30

जालना जिल्ह्यातील अंबड येथील गोविंद गगराणी (वय १९) नामक तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी सकल राजस्थानी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मूक मोर्चा काढण्यात आला

 A huge silent march of the gross Rajasthani community in Beed | बीडमध्ये सकल राजस्थानी समाजाचा विशाल मूक मोर्चा

बीडमध्ये सकल राजस्थानी समाजाचा विशाल मूक मोर्चा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जालना जिल्ह्यातील अंबड येथील गोविंद गगराणी (वय १९) नामक तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी सकल राजस्थानी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मूकमोर्चा काढण्यात आला. यात जिल्हाभरातून तसेच जालना, अंबड येथील राजस्थानी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.
पेठ भागातील बालाजी मंदिरापासून सकाळी दहा वाजता मूकमोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चेकºयांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. डॉ. आंबेडकर चौक, सुभाष रोड, अण्णा भाऊ साठे चौक, बसस्थानक, शिवाजी पुतळा, नगर रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर सभेत भगीरथ बियाणी, सुभाष सारडा, सत्यनारायण लाहोटी, गंमत भंडारी, नंदकिशोर मुंदडा, नितीन कोटेचा, जुगलकिशोर लोहिया, विजयराज बंब, जि. प. चे माजी अध्यक्ष, विजयसिंह पंडित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, न. प. उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर, शिवसंग्रामचे नेते राजेंद्र मस्के, माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष गोविंद बजाज, जि. प. सदस्य अशोक लोढा, अंबड निवासी पुरुषोत्तम सोमाणी यांची भाषणे झाली. गोविंद गगराणी याच्या मारेकºयांना फाशीची शिक्षा द्यावी, तपासात कोणतीही त्रुटी राहू नये, या प्रकरणात पोलीस अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, यमराज ग्रुपची चौकशी करुन दोषींना अटक करावी आदी मागण्या वक्त्यांनी भाषणातून केल्या. या वेळी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी फोनद्वारे भावना व्यक्त करुन मोर्चाला पाठींबा दिला. दिवंगत गोविंद गगराणी यास श्रध्दांजलीनंतर जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
मोर्चामध्ये सत्यनारायण लाहोटी, नंदकिशोर मुंदडा, सुरेशचंद्र लड्डा, सुभाष सारडा, नितीन कोटेचा, विजयराज बंब, संतोष सोहनी, आदित्य सारडा, भगीरथ चरखा, शांतीलाल पटेल, अशोक लोढा, मदन दुगड, गिरीश सोहनी, संतोष चरखा, शुभम धूत , दिलीप सोहनी, किशोर बाहेती, अमर सारडा, हनुमान मंत्री, अमृत सारडा, दिलीप मंत्री, मनमोहन कलंत्री, प्रदीप चितलांगे, शाम पारीख, अशोक तिवारी, बिपीन लोढा, सचिन कांकरीया, बालाप्रसाद तापडिया, जयनारायण अग्रवाल, पारस बोरा, अक्षय मुंदडा, सुभाष बाहेती, विनोद मुंदडा, मदनलाल अग्रवाल, रोहित अग्रवाल, जवाहर कांकरिया, राजेंद्र मुनोत, विष्णुदास तापडीया, रामेश्वर कासट, दिलीप मंत्री, दिनेश मुंदडा, पुरुषोत्तम रांदड, ओमप्रकाश भुतडा, अमर बाहेती, रामेश्वर बियाणी, सुभाष जाखेटिया, जुगलकिशोर लोहिया, नंदकिशोर तोतला, चंदुलाल बियाणी, जयपाल लाहोटी, गोविंद बजाज, जुगल झंवर, राधेश्याम लोहिया, राजेंद्र इंदाणी, राधेश्याम अट्टल, गोपाल सोनी, डॉ. सिकची यांच्यासह हेमंत क्षीरसागर,अमर नाईकवाडे, अनिल जगताप, फारुक पटेल, बाळासाहेब गुंजाळ, डॉ. योगेश क्षीरसागर, सुहास पाटील, भरत झांबरे, जयसिंह चुंगडे, बिभीषण लांडगे, अंबाजोगाईचे नगरसेवक संतोष शिनगारे, नगरसेवक दिनेश भराडीया तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते सहभागी झाले.

Web Title:  A huge silent march of the gross Rajasthani community in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.