मुकुंदवाडी स्टेशनवर विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

By Admin | Published: July 11, 2017 03:16 PM2017-07-11T15:16:49+5:302017-07-11T15:17:18+5:30

रेल्वे उड्डाणपूल झालाच पाहिजे, भूयारी मार्ग झालाच पाहिजे अशा विद्यार्थी, पालक यांच्या घोषणांनी मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन दणाणून गेले.

Hulking students at Mukundwadi station | मुकुंदवाडी स्टेशनवर विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

मुकुंदवाडी स्टेशनवर विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत

 

औरंगाबाद : मुकुंदवाडी स्टेशनवर रेल्वे उड्डाणपूल झालाच पाहिजे, भूयारी मार्ग झालाच पाहिजे अशा विद्यार्थी, पालक यांच्या घोषणांनी सकाळी ११ वाजता  मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन दणाणून गेले.
 
 रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रुळावरून होणारी ये-जा रोखण्यासाठी लोखंडी बॅरिकेटस् लावले आहेत. यामुळे संपूर्ण परिसराची कोंडी होत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
 
मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनच्या परिसरातील शिवशाहीनगर, साईनगर, बंबाटनगर, राजनगर भागाचा गेल्या काही वर्षात मोठा विस्तार झाला आहे. या भागातील लोकांना शहरात ये-जा करण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडावा लागतो. रेल्वे रुळावरून वाहने नेण्याचा प्रकार रोखण्यासाठी ‘दमरे’ने रुळाच्या बाजून लोखंडी बॅरिकेट्स उभारले आहेत. त्यामुळे पादच्या-यांनाही रेल्वे रुळ ओलांडणे अशक्य होत आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरून ये-जा केली करावी लागते. परंतु प्लॅटफॉर्मवर जाताच रेल्वे प्रशासनातर्फे विनातिकिट प्लॅटफॉर्मवर आल्याची कारवाई केली जाते. या रोजच्या समस्यावर संतप्त व्यक्त करत नागरिकांनी हो घोषणाबाजी केली. 

Web Title: Hulking students at Mukundwadi station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.