उद्या देशव्यापी संपअंतर्गत औरंगाबादेत मानवी साखळी
By | Published: November 26, 2020 04:12 AM2020-11-26T04:12:54+5:302020-11-26T04:12:54+5:30
ही बंदची हाक का देण्यात आली, त्यातल्या मागण्या व केंद्र सरकारतर्फे कोरोनाच्या आडून सुरू असलेली विशेषत: शेतकरी व कामगारांची ...
ही बंदची हाक का देण्यात आली, त्यातल्या मागण्या व केंद्र सरकारतर्फे कोरोनाच्या आडून सुरू असलेली विशेषत: शेतकरी व कामगारांची मुस्कटदाबी यावर या पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरे झाली. केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
वाढते खाजगीकरण, सरकारी मालमत्तांची विक्री, ट्रेड युनियन्सचे अस्तित्वच संपुष्टात आणणे या प्रकारांमुळे सध्या प्रचंड असंतोष पसरला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ॲड. मनोहर टाकसाळ, साथी सुभाष लोमटे , सीपीआय एमएलचे कॉ. बुद्धिनाथ बराळ, कामगार सेनेचे प्रभाकर मते, सुभाष पाटील, कॉम्रेड प्रकाश बनसोड, आशा वर्कर्सच्या नेत्या कॉम्रेड मंगल ठोंबरे, मनपा कामगारांचे नेते रतनकुमार पंडागळे, कॉम्रेड अभय टाकसाळ, लक्ष्मण साक्रूडकर, कॉम्रेड दामोदर मानकापे, कॉम्रेड श्रीकांत फोपसे आदींची उपस्थिती होती.
बंदअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समित्याही बंद राहतील, असे साथी सुभाष लोमटे यांनी सांगितले, तर आम्ही पैठणगेट येथे सकाळी निदर्शने करणार असल्याचे कॉम्रेड बुद्धिनाथ बराळ यांनी जाहीर केले. या संपात औरंगाबादचे एक लाख कामगार सहभागी होतील, असे प्रभाकर मते यांनी जाहीर केले. व्हिडिओकॉन कामगारांचा संप गेल्या दीड वर्षापासून सुरू असूनही त्याकडे कोणी लक्ष देत नसल्याबद्दल कॉम्रेड अभय टाकसाळ यांनी यावेळी खंत व्यक्त केली. आशा वर्कर्सचे प्रश्नही सुटत नसल्याबद्दल कॉम्रेड ठोंबरे यांनी नाराजी व्यक्त केली.