सिडको-हडकोत कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:16 AM2018-05-29T01:16:11+5:302018-05-29T01:16:34+5:30

शहरात कचराकोंडी सुरू झाल्यापासून सिडको-हडको आणि चिकलठाणा परिसरातील विविध वॉर्डांमध्ये ओल्या कच-यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यात येत आहे.

Hundred per cent processing of CIDCO-HUDCO waste | सिडको-हडकोत कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया

सिडको-हडकोत कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात कचराकोंडी सुरू झाल्यापासून सिडको-हडको आणि चिकलठाणा परिसरातील विविध वॉर्डांमध्ये ओल्या कच-यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यात येत आहे. सिडको एन-५ येथे मनपाने कोणताही फारसा खर्च न करता कच-यावर दर्जेदार प्रक्रिया केली आहे. हीच पद्धत शहरातील विविध वॉर्डांमध्ये आत्मसात केल्यास कच-याचा प्रश्न सुटेल.
महापालिकेने कचराकोंडी सुटावी म्हणून तब्बल पाच कोटी रुपये खर्च करून कंपोस्ट पीट तयार केले. या कचरा पीटचा काहीच उपयोग होत नसल्याचे समोर येत आहे. मग मनपाने कोट्यवधी रुपयांचा खर्च कशासाठी केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ४३० पैकी १७० कच-याचे पीट यापुढे उभारण्यात येऊ नयेत, असे आदेश महापौरांनी दोन दिवसांपूर्वीच मनपा प्रशासनाला दिले आहेत. सिडको-हडको भागात वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि जवानांनी मिळून अल्प खर्चात कंपोस्ट पीट तयार केले आहेत. एन-५ कम्युनिटी सेंटर येथे लोखंडी जाळीत दररोज ओला कचरा टाकण्यात येत आहे. या कचºयात शेण, पालापाचोळा टाकण्यात येतो. अवघ्या २० ते २२ दिवसांमध्ये दर्जेदार खत तयार होत आहे. विशेष बाब म्हणजे परिसरात या कंपोस्ट पिटाची फारशी दुर्गंधीही येत नाही. कमी खर्चात हा प्रयोग यशस्वी होत असल्याने मनपा सर्वत्र हीच पद्धत का अवलंबत नाही, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पुंडलिकनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी यांनी अशाच पद्धतीचा
प्रयोग यशस्वी करून दाखविला
आहे.
जुन्या शहरात प्रत्येक चौकात कच-याचे ढीग दिसून येत आहेत. या भागात डोअर टू डोअर कलेक्शन यंत्रणाच कुचकामी ठरत आहे. शंभर टक्के कलेक्शन झाल्यास नागरिक चौकात कशासाठी कचरा आणून टाकतील...? मनपाने प्रत्येक वॉर्डात दोन रिक्षा लावल्या आहेत. या रिक्षा कधी येतात आणि कधी जातात हे कोणालाच माहीत नाही. नगरसेवकही फारसे लक्ष देत नाहीत. अनेक भागांत तर निव्वळ कचरा जाळण्याचे प्रकार मनपा कर्मचारीच करीत आहेत.

Web Title: Hundred per cent processing of CIDCO-HUDCO waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.