दीड हजार एकर ऊसाचे पावसामुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:11 AM2017-10-27T01:11:25+5:302017-10-27T01:11:30+5:30

रविवारी रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळे बाºहाळी परिसरातील सुमारे दीड हजार एकर परिसरातील उसाचे नुकसान झाले़

Hundreds of acres of damage due to cane rain | दीड हजार एकर ऊसाचे पावसामुळे नुकसान

दीड हजार एकर ऊसाचे पावसामुळे नुकसान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बाºहाळी : रविवारी रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळे बाºहाळी परिसरातील सुमारे दीड हजार एकर परिसरातील उसाचे नुकसान झाले़
बाºहाळीसह थोटवाडी, बापशेटवाडी, सुगाव कॅम्प, पैैसमाळ, मौलालीमाळ, मांजरी, निवळी, हिप्पळनारी, सकनूर, कबनूर आदी गावांमध्ये उसाचे जवळपास १५०० एकर क्षेत्र आहे़ जूनपासून पाऊस जेमतेम झाला तरी परिसरात उसाची वाढ चांगली झाली होती़ त्यामुळे शेतकरी आनंदीत होते़ मात्र २२ आॅक्टोबरच्या पावसाने शेतकºयांच्या आनंदावर विरजन पसरविले़ जवळपास सर्वच ऊस जमीनदोस्त झाला़ सोबत मुळीसुद्धा उपटल्या गेल्या़ त्यामुळे पुढील दोन वर्षे येणारे खोडवा पीकही अधांतरी झाले़
ऊस पडल्यामुळे त्याला उंदीर लागणे, मुळ्या फुटणे, रानडुकरांचा त्रासही मोठ्या प्रमाणात सुरू झाला़ त्यात पाण्याची कमतरता असल्याने उसाच्या वजनात मोठी घट होईल हे निश्चित आहे़ याशिवाय तोडणी करणाºया मजुरांकडूनही पिळवणूक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे़

Web Title: Hundreds of acres of damage due to cane rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.