शेकडो एकरात उन्हाळी कापूस

By Admin | Published: June 16, 2014 12:19 AM2014-06-16T00:19:00+5:302014-06-16T00:25:52+5:30

प्रा़ गंगाधर तोगरे, कंधार मृग मृग नक्षत्र कोरडे गेले. मान्सून उशीर करत असल्याने उन्हाळी कापसाची लागवड केलेल्या श्ेतकऱ्यांची पाण्यासाठी कासावीस होत आहे.

Hundreds of acres of summer cotton | शेकडो एकरात उन्हाळी कापूस

शेकडो एकरात उन्हाळी कापूस

googlenewsNext

प्रा़ गंगाधर तोगरे, कंधार
मृग मृग नक्षत्र कोरडे गेले. मान्सून उशीर करत असल्याने उन्हाळी कापसाची लागवड केलेल्या श्ेतकऱ्यांची पाण्यासाठी कासावीस होत आहे. पावसाचा मागमूस नसल्याने सुमारे १०० एकरवरील कापसाला जगविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड चालू असल्याचे चित्र आहे.
गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले. संततधार व रिमझिम पावसाने शेत दलदलीत अडकले. पिकापेक्षा तणकट अधिक वाढले. त्यातच सोयाबीन-कापसावर रोगाचा प्रादुर्भाव झाला. रानटी जनावरांनी पिकांची नासधूस केली. पिकांचे निसर्ग लहरीने योग्य पोषण झाले नाही. पिकांचा अपेक्षित उतारा आला नाही. नगदी पिकाला आता सारखा भाव मोसमात मिळाला नाही. त्यामुळे खरीप हंगामातून श्ेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित काही लागले नाही. त्यामुळे जलसाठा उपलब्ध असल्याने अपेक्षेने शेतकऱ्यांनी रबी हंगामाकडे मोर्चा वळविला.
रबी हंगामातील गव्हाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. शिवारात गहू बहरल्याने चेहऱ्यावर आनंद तरळू लागला. अपेक्षेपेक्षा जास्त उतारा येण्याची अपेक्षा बळावली. परंतु हे निसर्गाच्या अवकृपेने शक्य झाले नाही. जवळपास ६० गावात मार्चच्या पहिल्या आठवड्यात गारपीट झाली. गहू, संत्री, मोसंबी, केळीचे मोठे नुकसान झाले. अपेक्षेवर निसर्गाने पाणी फिरविले.तुटपुंजे अनुदान कुचकामी ठरले. नुकसानीचे पंचनामे करताना योग्य पद्धतीने झाले नाहीत. अशा तक्रारीचा ओघ गावागावांतून सुरू झाला. खरीप व रबीतील अनुभव सुखद नसतानाही शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने २०१४ च्या खरीप हंगामाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली परंतु मान्सून अद्याप पोहोचला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मागील वर्षीचा कटू अनुभव बाजूला सारत श्ेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी पांढरे सोने जमिनीत टाकले. मोठ्या आशेने लागवड केलेल्या कापसाची मशागत करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. भारनियमनाची कटकट, पावसाची उघडीप सरत आलेला जलसाठा आदीने शेतकरी चिंतेत आहे. काहींना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे निसर्ग पावसाकडे डोळे आशाळभूत नजरेने कोरडेठक पडले आहेत. वाखरड, वाखरडवाडी, जंगमवाडी, बिजेवाडी, बहाद्दरपुरा, फुलवळ, पिंपळ्याचीवाडी, मुंडेवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे आहेत. कंधार शहर व परिसरात ११ जून रोजी २५ मि.मी. पावसाची नोंद झाली. परंतु पेठवडज, कुरुळा, उस्माननगर, फुलवळ, बारुळ गावासह परिसराकडे अद्याप पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे उन्हाळी कापसाला जगविण्याचा प्रश्न जिकिरीचा झाला असून शेतकऱ्यांना मान्सून दाखल होण्याची प्रतीक्षा आहे.
गत खरीप व रबी हंगामाला निसर्ग लहरीपणाचा फटका बसला. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले. बी-बियाणाचा, सालगड्याचा,मशागतीचा खर्च निघणे अवघड झाले. नव्या आशेने अनेकांनी उन्हाळी कापसाची लागवड केली. परंतु निसर्गाला शेतकऱ्याची कीव यावी, अशीच अपेक्षा कंधार तालुक्यातील पिंपळ्याची वाडी येथील शेतकरी विठ्ठल मुंडे यांनी व्यक्त केली़
पहिल्याच पावसात जीवित हानी
शेतकरी पावसाची प्रतीक्षेत असताना १३ जून रोजी पावसाच्या हजेरीपेक्षा विजांचा कडकडाट अधिक होता. गऊळ येथील एक व ब्रम्हवाडी येथील एकाचा वीज पडून मृत्यू झाला. गरीब कुटुंबावर निसर्गाने आघात केला. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मृत्यू पावलेल्या व जखमींना तात्काळ मदत देण्याची गरज आहे. प्रशासन याकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा आहे. १३ जून रोजी झालेला पाऊस उन्हाळी कापसाला अल्प ठरला. फुलवळ ३ मि.मी., कुरुळा-२ मि.मी, उस्माननगर-४०, बारुळ ३० व कंधार १२ मि.मी. झाला. पेठवडज पुन्हा निरंक राहिले.

Web Title: Hundreds of acres of summer cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.