सायबर पोलिसांकडे शंभर तक्रारी पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:07 AM2021-03-13T04:07:42+5:302021-03-13T04:07:42+5:30
शहर सायबर पोलीस ठाण्यात दररोज ऑनलाईन फसवणूक आणि समाजमाध्यमावर आक्षेपार्ह छायाचित्र आणि व्हिडिओ क्लीप टाकून बदनामी आणि आधारे ब्लॅकमेल ...
शहर सायबर पोलीस ठाण्यात दररोज ऑनलाईन फसवणूक आणि समाजमाध्यमावर आक्षेपार्ह छायाचित्र आणि व्हिडिओ क्लीप टाकून बदनामी आणि आधारे ब्लॅकमेल होत असल्याच्या तक्रार अर्ज प्राप्त होतात. सायबर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक आणि ३० कर्मचारी कार्यरत आहेत. हे अधिकारी, कर्मचारी प्राप्त अर्जावर झटपट कार्यवाही सुरू करतात.
गतवर्षी ऑनलाईन फ्रॉडच्या ८४१ तक्रार अर्जांवर पोलिसांनी झटपट कारवाई करून तक्रारदारांना त्यांचे पैसे परत मिळवून दिले. याशिवाय समाजमाध्यमावर ब्लॅकमेल आणि बदनामी करण्यात आल्याच्या ५५९ तक्रार अर्जावर कारवाई करून संबंधित अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित पोलीस ठाण्याला वर्ग केले.
टेलीग्रामसारख्या काही समाजमाध्यमाचे सर्व भारताबाहेर आहेत. त्यांचे नोडल अधिकारी कोण आहेत, हे देखील कळत नाही. ही मंडळी पोलिसांनी मागितलेली माहिती त्याच्या गोपनीयतेच्या नियमाचे कारण सांगून पोलिसाना देत नाही. यामुळे पोलिसांना प्राप्त १०० हून अधिक अर्जाच्या तपासांत अडचणी आल्याचे सूत्राने सांगितले.
======================
वर्षभरात ४३ आरोपींना अटक
औरंगाबाद शहर सायबर पोलीस ठाण्यात वर्षभरात ७७ गुन्हे नोंद झाले. यापैकी ३४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. यात ४३ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर यावर्षी २०२१ मध्ये १५ गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी ६ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. या गुन्ह्यात ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
==================
२०२० मधील सायबर गुन्हे
पोलीस ठाणे - दाखल गुन्हे
सिटीचौक -० १
क्रांतीचौक -०५
वेदांतनगर ठाणे -० ५
बेगमपुरा -०४
छावणी - ०६
वाळूज -०१
एमआयडीसी वाळूज-०५
उस्मानपुरा - ०४
जवाहरनगर - ०३
सातारा - ०३
मुकुंदवाडी - ०५
पुंडलिकनगर - ०७
सिडको - ०८
हर्सुल ठाणे - ०४
जिंसी ठाणे - ०५
सायबर ठाणे - ११
============
एकूण गुन्हे ७७
======================
कोट
सायबर पोलीस ठाण्याकडे प्राप्त अर्जावर झटपट कार्यवाही केली जाते. पोलीस अधिकारी कर्मचारी गुन्ह्याशी सबंधित नोडल एजन्सी ई-मेलच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून माहिती मागवितात. बऱ्याच प्रकरणांत माहिती उशिरा मिळते. तर काही एजन्सी माहितीच देत नाहीत. त्यांचे सर्व्हर भारताबाहेर आहेत, अशा कंपनीकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. यामुळे प्राप्त तक्रार अर्जावरील कारवाई झटपट होत नाही.
================
सायबर पोलिसांनी गतवर्षी साडेअकरा लाख रुपये दिले
बँका आणि विविध वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक झालेल्या ५५ अर्जदारांना ११ लाख ५४ हजार ५८१ रुपये सायबर पोलिसांनी गतवर्षी परत मिळवून दिले आहेत.