लोहा शहरात चालतात मटक्याचे दीडशे अड्डे

By Admin | Published: September 13, 2014 11:39 PM2014-09-13T23:39:44+5:302014-09-13T23:53:08+5:30

प्रदीपकुमार कांबळे, लोहा मटक्याच्या माध्यमातून झटपट श्रीमंतीची स्वप्ने पाहणाऱ्यांचे दिवाळे निघत आहे़

Hundreds of ferry towers in the city of Iron | लोहा शहरात चालतात मटक्याचे दीडशे अड्डे

लोहा शहरात चालतात मटक्याचे दीडशे अड्डे

googlenewsNext

प्रदीपकुमार कांबळे, लोहा
मटक्याच्या माध्यमातून झटपट श्रीमंतीची स्वप्ने पाहणाऱ्यांचे दिवाळे निघत आहे़ गत अनेक दिवसांपासून बंद पडलेला मटका आता नव्या दमाने सुरु झाला आहे़ चक्क खुलेआमपणे चालणाऱ्या मटक्याचे लोहा शहरात तब्बल दीडशे अड्डे आहेत़ त्यात कळस म्हणजे पोलिस ठाण्यासमोरच मटका बुकींनी आपले ठाण मांडले आहे़
लोहा पोलिस ठाणेहद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत़ त्यामुळे उच्चभ्रू वस्तीत चालणाऱ्या जुगारांच्या अड्ड्यांचा समावेशही आहे़ मुंबई-कल्याण नावाचा मटका शहरात राजरोसपणे प्रत्येक ठिकाणी सुरु असल्याचे पहावयास मिळते़ लोहा शहरातील शिवाजी चौक, सायाळ रोड, मुक्ताईनगर, बालाजी मंदिर परिसर, तहसील कार्यालय, जायकवाडी परिसर, बसस्थानक व परिसर, शिवकल्याणनगर, बैल बाजार, जुन्या लोह्यातील भोईगल्ली, नवी आबादी आदी ठिकाणी मटक्याची दुकाने थाटली आहेत़
मटका घेण्यासाठी ग्रामीण भागातील अनेकांचे पाय भल्या पहाटेच शहराकडे वळत आहेत़ मटक्यात जिंकणारे आणि अन् हरणारे नंतर ‘देशीप्रेमा’च्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा करीत असल्याचेही दिसत आहे़ एवढ्या मोठ्या प्रमाणात खुलेआम मटका सुरु राहण्यास पोलिस प्रशासनही तेवढेच जबाबदार आहे़ गत पंधरा वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आकड्यांचा हा खेळ सुरु आहे़
लोहा पोलिसांत तब्बल सहा अधिकारी कर्तव्यावर असतानादेखील मटका मात्र दिवसेंदिवस बहरतच चालला आहे़ मटका घेण्यासाठी शहरात तब्बल एक हजारांवर बुकी असल्याची माहिती हाती आली आहे़ तर लोहा ठाण्यासमोरील एका दुकानात मटक्याचा अड्डा धुमधडाक्यात सुरु आहे़ आकड्यांच्या या खेळामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत़ परंतु कल्याण-मिलनच्या या खेळात मटका बुकी आणि पोलिसांची मात्र चांदी होत असल्याचे दिसत आहे़
याबाबत आता जिल्हा पोलिस अधीक्षकांनीच लक्ष घालण्याची मागणी लोहावासियांनी केली आहे़
दुपारी एक वाजेपासून सुरु होणारा हा आकड्यांचा खेळ रात्री सव्वाबारा वाजेपर्यंत सुरु राहतो़ मॉर्निंग डे ते बॉम्बे या मटक्याच्या वेगवेगळ्या वेळांमध्ये ओपन आणि क्लोज या आकड्यांचेच खेळ असतात़ त्याच्या विळख्यात तरुणाई दिवसेंदिवस अडकत चालली आहे़
मटक्याचे आकडे येण्याच्या वेळा पुढीलप्रमाणे- मॉर्निंग डे- १ वा़ओपन, २ वाक़्लोज, मिलन डे- ३ वा़ओपन, कल्याण- ४ वा़ओपन, मिलन-५ वाक़्लोज, कल्याण-६ वाक़्लोज, नाईट मिलन-९वा़ओपन, बॉम्बे ओपन-९़३० मिनिटांनी, मिलन- ११ वा़२० मिनिटांनी क्लोज व शेवटी बॉम्बे क्लोजचा आकडा हा रात्री १२ वा़१० मिनिटांनी येतो़ दुपारपासून सुरु असलेला हा आकड्यांचा खेळ सर्वत्र एकसारखाच असतो़ मटका घेणाऱ्या बुकीला या ठरावीक वेळेला नेमका कोणता आकडा आला याची माहिती दिली जाते़ त्यानंतर कर्नोपकर्नी ती सर्वापर्यंत पोहोचविली जाते़ अवैध इमानदारीच्या या खेळात मात्र एकमेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार सहसा पहावयास मिळत नाही़

Web Title: Hundreds of ferry towers in the city of Iron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.