आयटीआयचे शेकडो विद्यार्थी परीक्षेला मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:50 AM2017-11-28T00:50:28+5:302017-11-28T00:50:32+5:30

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेऊन प्रशिक्षण (अ‍ॅप्रेंन्टिसशिप) कालावधीनंतर मंगळवारपासून घेण्यात येणाºया लेखी परीक्षेला शेकडो विद्यार्थी हॉलतिकीट मिळाले नसल्यामुळे मुकणार आहेत. यात महाविद्यालय प्रशासनाने चूक केल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला, तर प्राचार्यांनी हे आरोप फेटाळत विद्यार्थ्यांनीच आॅनलाइन अर्ज भरले नसल्याचे सांगितले.

 Hundreds of ITI students lost their exams | आयटीआयचे शेकडो विद्यार्थी परीक्षेला मुकणार

आयटीआयचे शेकडो विद्यार्थी परीक्षेला मुकणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेऊन प्रशिक्षण (अ‍ॅप्रेंन्टिसशिप) कालावधीनंतर मंगळवारपासून घेण्यात येणाºया लेखी परीक्षेला शेकडो विद्यार्थी हॉलतिकीट मिळाले नसल्यामुळे मुकणार आहेत. यात महाविद्यालय प्रशासनाने चूक केल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला, तर प्राचार्यांनी हे आरोप फेटाळत विद्यार्थ्यांनीच आॅनलाइन अर्ज भरले नसल्याचे सांगितले.
आयटीआय महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष कोणत्याही कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे लागते. वर्षभर काम केल्यानंतर त्याविषयी लेखी परीक्षा घेण्यात येते. ही लेखी परीक्षा मंगळवापासून तीन दिवस शहरातील एका केंद्रावर होणार आहे. यासाठी २५ आॅक्टोबरपर्यंत परीक्षेसाठीचा अर्ज आॅनलाइन भरणे आवश्यक होते. या मुदतीत अर्ज भरलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट मिळालेले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. महाविद्यालय प्रशासनाने लक्ष दिले नसल्यामुळे ही चूक घडली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या चुकीची किंमत विद्यार्थ्यांना भोगावी लागणार आहे; मात्र ओळखीच्या विद्यार्थ्यांना २५ आॅक्टोबरनंतरही अर्ज केल्यानंतर हॉलतिकीट देण्यात आल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. हॉलतिकीट न मिळालेल्यांमध्ये १०० पेक्षा अधिक विद्यार्थी असून, त्याविषयी महाविद्यालय माहिती लपवून ठेवत आहे. यातील अनेक विद्यार्थी खेड्यातून शहरात शिक्षणासाठी आलेले आहेत, तर काही विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या संधी वाया जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. याविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य सलीम शेख यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी विद्यार्थ्यांची चूक असल्याचे सांगितले. तरीही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी डीटीईकडे परवानगी मागितली असल्याचे सांगितले.

Web Title:  Hundreds of ITI students lost their exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.