घाटीत पुन्हा शंभरावर रुग्ण
By | Published: December 2, 2020 04:04 AM2020-12-02T04:04:53+5:302020-12-02T04:04:53+5:30
स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ औरंगाबाद : कोरोनाच्या परिस्थितीमुळे एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात ...
स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ
औरंगाबाद : कोरोनाच्या परिस्थितीमुळे एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एसटीकडून विविध २७ सामाजिक घटकांना तिकिटात ३३ टक्क्यांपासून १०० टक्के सवलत दिली जाते. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली. कोरोनामुळे अनेकांना आगारात येऊन कार्ड घेता येत नसल्याने योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
औरंगपुऱ्यातील शौचालय कुलूपबंद
औरंगाबाद : औरंगपुऱ्यात जिल्हा परिषदेच्या मैदानाजवळील मनपाचे शौचालय कुलूपबंद आहे. त्यामुळे खरेदीसह विविध कामांसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज असून, शौचालय कधीही बंद राहता कामा नये, अशी मागणी हाेत आहे.
‘परिषद की पाठशाला’ अभियान
औरंगाबाद : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्युत कॉलनीत ‘परिषद की पाठशाला’ या अभियानाला रविवारी सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांना मास्क, वही- पेनचे वाटप करण्यात आले. जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील, बजरंग दलाचे धर्म दादा बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला अंकिता पवार, स्नेहा पारीक, दीपक टोणपे, अंबादास मेव्हणकर, सुभाष बोडखे, धनंजय शेरकर, सावरी देशमुख, संकेत श्रीखंडे, निखिल सोनी यांची उपस्थिती होती.
घाटीतून बेगमपुऱ्याकडे वाहनांची ये-जा बंद
औरंगाबाद : घाटीतून बेगमपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. याठिकाणी केवळ पादचाऱ्यांना ये-जा करता येईल एवढी जागा सोडण्यात आली आहे. संरक्षक भिंतीमुळे घाटीतून बेगमपुऱ्याकडे ये-जा होणारी वाहनांची वर्दळ थांबली आहे.