वर्षभरात साडेचार हजारांवर गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 11:23 PM2019-02-06T23:23:45+5:302019-02-06T23:24:12+5:30

शहरात अवैध गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर एक-एक धागेदोरे मनपा आणि पोलिसांच्या हाती लागत आहे. गर्भलिंग निदान केल्यानंतर अवैध गर्भपात करणाºयांचा शोध घेण्यात येत आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे शहरात नोंदणीकृत केंद्रांवर वर्षभरात सुमारे साडेचार हजारांवर गर्भपात झाल्याची माहिती समोर आली.

Hundreds of thousands of abortions throughout the year | वर्षभरात साडेचार हजारांवर गर्भपात

वर्षभरात साडेचार हजारांवर गर्भपात

googlenewsNext
ठळक मुद्देधक्कादायक : ‘अवैध’च्या शोधाबरोबर अधिकृत केंद्रेही निशाण्यावर येण्याची शक्यता


औरंगाबाद : शहरात अवैध गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर एक-एक धागेदोरे मनपा आणि पोलिसांच्या हाती लागत आहे. गर्भलिंग निदान केल्यानंतर अवैध गर्भपात करणाºयांचा शोध घेण्यात येत आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे शहरात नोंदणीकृत केंद्रांवर वर्षभरात सुमारे साडेचार हजारांवर गर्भपात झाल्याची माहिती समोर आली.
महापालिका आणि पोलिसांनी शहरात २२ जानेवारी रोजी अवैध गर्भलिंग निदान करणाºया डॉक्टरांची टोळी जेरबंद केली. या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक झाली आहे. यात चार डॉक्टर, तीन नातेवाईक आणि एका लॅब टेक्निशियनचा समावेश आहे. कायद्यानुसार काही कारणांमुळे गर्भपात करता येतो. याचा फायदा घेऊन गर्भलिंग निदानानंतर संबंधित महिलेला गर्भपातासाठी अवैध गर्भपात करणाºया ठिकाणांबरोबर टोळीने नोंदणीकृत केंद्रांवरही पाठविल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अवैध गर्भपात करणाºयांचा शोध घेण्याबरोबर नोंदणीकृत केंद्रांचीही झाडाझडती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शहरात १४३ नोंदणीकृत गर्भपात केंद्र आहेत. याठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे तपासणी केली जाते. गर्भधारणेनंतर काही कारणांमुळे महिलेला गर्भपात करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी नियमानुसार अर्ज आणि आवश्यक प्रक्रिया करून २० आठवड्यांपर्यंतचा गर्भपात करता येतो. यामध्ये उपलब्ध सोयीसुविधांनुसार काही केंद्रांना १२ आठवड्यांपर्यंतचे तर काही केंद्रांना २० आठवड्यांपर्यंतचे गर्भपात करण्याची परवानगी आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार वर्षभरात नोंदणीकृत सुमारे साडेचार हजार गर्भपात करण्यात आलेले आहे.
गर्भपाताची ही आहेत कारणे
महिलेची मानसिक आणि सामाजिक परिस्थिती योग्य नसेल, आधी मुले असल्याने होणाºया नव्या बाळाचा सांभाळ अशक्य होणार असेल, गर्भनिरोध साधनांचा वापर करूनही गर्भ राहिल्यास गर्भपात केला जातो. याबरोबरच एखाद्या आजारपणात गर्भधारणा झाली आणि त्यामुळे आईच्या जिवावर बेतत असेल, तर गर्भपात करता येतो. अत्याचारामुळे गर्भ राहिलेला असेल, अशावेळी गर्भपात केला जातो. या सर्व कारणांमुळे कायदेशीररीत्या गर्भपात करता येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. एकट्या घाटीत वर्षभरात १ हजार ३०० गर्भपात झाले आहेत.
आणखी किती डॉक्टर?
चार डॉक्टर जेरबंद झाल्यानंतर गर्भलिंग निदान करणाºया टोळीत आणखी किती डॉक्टर सहभागी आहे, असा प्रश्न जनसामान्यांतून विचारला जात आहे.
दोन वर्षांपूर्वी झाडाझडती
मार्च २०१७ मध्ये सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ गावी बेकायदेशीर गर्भपाताची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, सोनोग्राफी सेंटर तसेच शासनमान्य गर्भपात कें द्रांची झाडाझडती घेण्यात आली होती. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्यांतर्गत जिल्ह्यात कोणत्याही नोंदणीकृत, अनोंदणीकृत केंद्रांतील डॉक्टर किंवा अन्य कोणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु या मोहिमेतून काहीही साध्य झालेले नसल्याची परिस्थिती अवैध गर्भलिंग निदान करणाºया टोळीमुळे समोर आले आहे.
डॉक्टरांकडून पडताळणी
नोंदणीकृत केंद्रांवर गर्भपात करण्यापूर्वी डॉक्टरांकडून पडताळणी केली जाते. गर्भपात नेमके कोणत्या कारणांमुळे आणि का करत आहे, हे पाहिले जाते. नोंदणीकृत केंद्रांसंदर्भात नियमित तपासणी केली जाते. गर्भलिंग निदान करणाºया टोळीत आणखी किती जण सहभागी आहेत, हे सध्यातरी सांगता येणार नाही. एक एक बाब समोर येत आहे. गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्याची तयारी सुरूआहे.
-डॉ. नीता पाडळकर,
आरोग्य अधिकारी, मनपा

Web Title: Hundreds of thousands of abortions throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.