दीड हजार जणांना मिळणार हक्काचे घर
By Admin | Published: July 14, 2014 11:39 PM2014-07-14T23:39:09+5:302014-07-15T00:51:32+5:30
औसा : तालुक्यातील इंदिरा व आवास योजना, रमाई आवास योजना अंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील बेघर व कच्चा घरात राहणाऱ्यांना दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांसाठी
औसा : तालुक्यातील इंदिरा व आवास योजना, रमाई आवास योजना अंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील बेघर व कच्चा घरात राहणाऱ्यांना दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांसाठी १४३४ घरकुलांची मंजुरी जि़पक़डून देण्यात आली आहे़
२०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी संपुर्ण तालुक्यातील ६९ गावात इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजनेच्या घरकुलाची मंजुरी मिळाली असून यामध्ये पारघेवाडी-७, अंदोरा-१८, उटी बु़-१८, खुंटेगाव-१६, कार्ला-७४, उंबडगा खु़-०७, उंबडगा बु़-२६, बांगजी-३८, बेलकुंड-५६, मोगरगा-२४, सेलु-४३, तावशिताड-२९, नागरसोगा-४१, हासेगाव-०९, बुधोडा-७५, किनीथोट-५१, भंगेवाडी-महादेववाडी-०५, भादा-१५, हासाळा-१७, जमालपूर-०५, खरोसा-१६, शिवणी बु़-१८, चिंचोली का-३१, काळमाथा-१४, गुळखेडा-२६, बऱ्हाणपुर-हळदुर्ग-०२, हिप्परसोगा-०६, कवठा-केज-१९, सत्तधरवाडी-०३, कोरंगळा-३१, मासुर्डी-१५, येल्लोरी-३०, रामेगाव-२४, किनीनवरे-२८, आनंदवाडी-०९, येळी/देवंगा-१९, जयनगर-०५, टाका-५१, बिरवली-३२, वरवडा-०७, करजगाव-२३, शिवली-२४, मातोळा-७९, अलमला-४८, याकतपूर-०९, कन्हेरी-०६, एरंडी-१६, सारोळा-२०, भुसणी-०३, सिंदाळा लो़-०४, शिंदाळावाडी-०२, गोंद्री-२३, जायफळ-०४, वडजी-०५, आपचुंदा-०५, हसेगाववाडी-१०, चलबुर्गा-१०, धानोरा-१२, कुमठा-१९, फत्तेपुर-०२, भेटा-५०, वानवडा-२०, एकंबी-०९, लोदगा-२०, समदर्गा-१०, चिंचोली सोन-२१, लखनगाव-११, शिवणी लख-०१, बोरगाव ऩ-०२ असे एकूण १४३४ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे़ (वार्ताहर)
या योजनेचा लाभार्थ्यां लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव, राष्ट्रीयकृत बँकचा खाते क्रं ़, १०० रू़ बाँडवर हमीपत्र आवश्यक आहे़ वरील कागदपत्र ग्राम पंचायत मार्फत कार्यारंभ आदेशासाठी पंचायत समिती कार्यालयात दोन दिवसात सादर करावे व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पं़स़सभापती ठमुबाई आडे, उपसभापती दिनकर मुगळे, गटविकास अधिकारी कुंभार यांनी केले आहे़