चौकाची रचना बिघडल्यामुळे स्टेशन चौकात वाहतुकीचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 07:17 PM2018-11-26T19:17:41+5:302018-11-26T19:19:55+5:30

हजारो प्रवासी, पर्यटकांची आणि वाहनांची वर्दळ असलेल्या रेल्वेस्टेशन चौकात सध्या दररोज वाहतुकीचा बोजवारा उडतो आहे.

Hunge traffic jam at Station road; Due to the structural breakdown of the Chowk | चौकाची रचना बिघडल्यामुळे स्टेशन चौकात वाहतुकीचा उडाला बोजवारा

चौकाची रचना बिघडल्यामुळे स्टेशन चौकात वाहतुकीचा उडाला बोजवारा

googlenewsNext

औरंगाबाद : हजारो प्रवासी, पर्यटकांची आणि वाहनांची वर्दळ असलेल्या रेल्वेस्टेशन चौकात सध्या दररोज वाहतुकीचा बोजवारा उडतो आहे. एकीकडे चौकाची रचनाच बिघडून गेली आहे, तर दुसरीकडे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी वाहतूक पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त होत आहेत. 

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरून दररोज २४ रेल्वेंची ये-जा होते. त्यामुळे हजारो प्रवासी, पर्यटकांची ये-जा होते. रेल्वेस्टेशनमध्ये ये-जा करण्यासाठी वेगवेगळे दोन स्वतंत्र दरवाजे आहेत. रेल्वेस्टेशनमधून बाहेर पडण्याच्या गेटसमोर हा चौक आहे. हा गेट वनवे असून तेथून रेल्वेस्टेशनमध्ये वाहने नेण्यास बंदी आहे.

छावणी, मध्यवर्ती बसस्थानक, पैठण रोडकडून येणाऱ्या वाहनांना साधारणत: ५० मीटरचा वळसा घालून रेल्वेस्टेशनमध्ये जावे लागते. हे अंतर टाळण्यासाठी वाहनचालक थेट चौकातील (नो एंट्री) मार्गातून रेल्वेस्टेशनमध्ये घुसतात. त्यामुळे रेल्वेस्टेशनमधून बाहेर पडणारी आणि आतमध्ये जाणारी वाहने समोरासमोर येतात आणि वाहतूक जाम होते.

कोकणवाडी रस्त्याकडून पैठण रोडकडे जाणारे अनेक वाहनचालक चौकात वाहतूक सिग्नल लागलेले असतानाही वाहन पुढे नेतात, तर पैठण रोडकडून येणारे आणि रेल्वेस्टेशनमध्ये जाणारे वाहनचालकही नियमांचे उल्लंघन करून प्रवेश करतात. यातूनही कोंडीत भर पडते. चौकातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी याठिकाणी वाहतूक पोलीस असतात; परंतु ते केवळ बघ्याचीच भूमिका घेतात. सिग्नल तोडणारे, बाहेर पडणाऱ्या मार्गातून रेल्वेस्टेशनमध्ये प्रवेश करणारे आणि रस्त्यावरच रिक्षा उभ्या करणाऱ्यांवर कारवाई होत नाही.

पर्यटकांना बेशिस्त वाहतुकीचे दर्शन
चौकाच्या या अवस्थेमुळे रेल्वेस्टेशनमधून बाहेर पडणारे, पर्यटक आणि प्रवाशांना बेशिस्त वाहतुकीचे दर्शन प्रारंभीच घडते. त्याविषयी अनेक जण नाराजी व्यक्त करतात; परंतु वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत 

Web Title: Hunge traffic jam at Station road; Due to the structural breakdown of the Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.