धक्कादायक ! शिकारीसाठी बिबट्या झाडावर चढला अन अडकून गतप्राण झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 05:41 PM2021-12-02T17:41:17+5:302021-12-02T17:42:47+5:30

leopard dies on tree while hunting: झाडावर चढून बिबट्या वन्यप्राण्यांवर हल्ला चढवीत असतो. त्याच उद्देशाने आमदाबाद शिवारात मृतावस्थेत असलेला बिबट्यादेखील आला असावा

For the hunt, the leopard climbed the tree and got stuck and died | धक्कादायक ! शिकारीसाठी बिबट्या झाडावर चढला अन अडकून गतप्राण झाला

धक्कादायक ! शिकारीसाठी बिबट्या झाडावर चढला अन अडकून गतप्राण झाला

googlenewsNext

नाचनवेल ( औरंगाबाद ) : आमदाबाद (ता. कन्नड) शिवारातील मंगलसिंग राजपूत यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर लटकलेल्या अवस्थेत मृत झालेला बिबट्या आढळून ( leopard dies on tree while hunting ) आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचामृत्यू कसा झाला याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहे. याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देऊनसुद्धा ते बुधवारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी आले नव्हते.

आमदाबाद शिवारातील शेतकरी बुधवारी नेहमीप्रमाणे शेतकामासाठी आले असता दुपारच्या सुमारास अचानक वन्यप्राण्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने शेतकऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली. तेव्हा शेतकऱ्यांच्या आवाजाने राजपूत यांच्या शेतातील झाडाखाली उभ्या असलेल्या दुसऱ्या एका बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. या घटनेदरम्यान काही शेतकऱ्यांना त्याच झाडावर अन्य एक बिबट्या लटकलेला अवस्थेत दिसला. काही शेतकरी प्रसंगावधान राखत झाडाजवळ गेले असता त्यांना तो मृतावस्थेत आढळून आला. साधारण दोन दिवसांपासून तरी तो लटकलेला असावा, अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला. काही शेतकऱ्यांनी या संदर्भात कन्नड वनपरिक्षेत्र अधिकारी भिसे यांना फोनवरून माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आले नव्हते.

शिकारीच्या शोधात आला...
वन्यप्राण्यांना जंगलात खाद्य मिळत नसल्याने ते शेतवस्तीकडे वळू लागले आहेत. त्यामुळे नागरी वसाहतीत बिबट्या शिरल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. झाडावर चढून बिबट्या वन्यप्राण्यांवर हल्ला चढवीत असतो. त्याच उद्देशाने आमदाबाद शिवारात मृतावस्थेत असलेला बिबट्यादेखील आला असावा; परंतु तो झाडाच्या फादीत बसल्याने त्याला खाली उतरता न आल्याने अखेर त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला.

कायमच असतो वन्यप्राण्यांचा वावर
गेल्या आठवड्यातच आमदाबाद शिवारातील शेतकरी पुंडलिक बनकर यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला होता. पोलीस, वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने त्या बिबट्यास सुखरूप बाहेर काढले, तर बुधवारी पुन्हा एका बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे; तर दोन दिवसांपूर्वीच ट्रॅक्टरचालकांना शेतशिवारात बिबट्या दिसून आला होता. दरम्यान, नाचनवेल, आमदाबाद, आडगाव, मोहाडी हा परिसर वनक्षेत्रालगत असल्याने येथे वन्यप्राण्यांचा कायम वावर असतो.

Web Title: For the hunt, the leopard climbed the tree and got stuck and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.