औरंगाबाद शहराला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:16 AM2018-04-08T00:16:09+5:302018-04-08T00:19:10+5:30

भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या इशाºयानुसार, शहराला शनिवारी सायंकाळी वादळी वाºयाचा तडाखा बसला. वादळी वा-याच्या लाटा जणू गगनाला स्पर्श करीत होत्या, असा भास होत होता. अवघे १० मिनिटे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. जालना रोडवर तर धुळीमुळे समोरचे वाहन दिसेनासे झाले होते.

Hurricane strike in Aurangabad city | औरंगाबाद शहराला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा

औरंगाबाद शहराला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक झाडे कोसळली : शनिवारी सायंकाळी २० मिनिटे धुळीचे साम्राज्य, होर्डिंग फाटले

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या इशाºयानुसार, शहराला शनिवारी सायंकाळी वादळी वा-याचा तडाखा बसला. वादळी वाºयाच्या लाटा जणू गगनाला स्पर्श करीत होत्या, असा भास होत होता. अवघे १० मिनिटे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. जालना रोडवर तर धुळीमुळे समोरचे वाहन दिसेनासे झाले होते.
शहरात लावलेले मोठे होर्डिंग फाटून हवेत उडू लागले होते. शहरातील विविध भागांत असंख्य झाडे कोलमडून पडली होती.
चैैत्राच्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असताना अचानक शनिवारी दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि सायंकाळी पावणेपाच वाजेदरम्यान अचानक वादळी वा-याने शहराला घेरले. चिकलठाणा, रामनगर, संजयनगरच्या पाठीमागून वादळ उठले आणि आकाशापर्यंत धुळीच्या लाटा उठल्या.


यामुळे जालना रोडवरून जाणा-यांना मोठी आग लागली काय, असाच भास झाला होता; पण मुकुंदवाडीच्या रस्त्यावर धुळीचे वादळ आले, क्षणाधार्थ समोरची वाहने धुळीत दिसेनाशी झाली. यामुळे वाहनांची गती एकदम कमी झाली होती. रस्त्यावर वाहतूक जाम झाली. धुळीतून हळूहळू वाहने मार्ग काढत होती. वादळी वाºयाचा तडाखा एवढा जोराचा होता की इमारतीवर लावण्यात आलेले होर्डिंग फाटले व हवेत उडू लागले. सिडको एन-३, एन-४ सह शहरातील अन्य भागांत असंख्य झाडे कोलमडून पडली. यात काही वाहनांचे नुकसानही झाले. यामुळे ठिकठिकाणी वाहतूक जाम झाली होती. रस्त्यावर झाडाचा सुकलेला पालापाचोळा सर्वत्र पसरला होता. सिडको मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील उड्डाणपुलावरून पाहिले असता संपूर्ण शहराला वादळी वाºयाने घेरल्याचे दृश्य दिसत होते. सोसाट्याचा वारा व ढगाळ वातावरणामुळे काही काळ शहरवासीयांना उन्हापासून सुटका मिळाली.
झाड पडून वाहनांचे नुकसान
सिडको एन-३ व एन-४ येथे झाड कोसळून वाहनांचे नुकसान झाले. एमएच-२० एके-१२१२ व एमएच २० ईई ९८२४ या दोन कारवर झाड कोसळले. यामुळे कारच्या समोरील बाजूचे नुकसान झाले.

Web Title: Hurricane strike in Aurangabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.