विवरणपत्र भरण्याची लगीनघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:05 AM2021-03-25T04:05:57+5:302021-03-25T04:05:57+5:30

औरंगाबाद : आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने आयकरदाते, चार्टर्ड अकाउंटंट, कर सल्लागार यांच्याकडे लगीनघाई सुरू ...

Hurry to fill the return | विवरणपत्र भरण्याची लगीनघाई

विवरणपत्र भरण्याची लगीनघाई

googlenewsNext

औरंगाबाद : आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने आयकरदाते, चार्टर्ड अकाउंटंट, कर सल्लागार यांच्याकडे लगीनघाई सुरू झाली आहे.

पूर्वी आर्थिक वर्ष संपल्यानंतर दोन वर्षांपर्यंत आयकर परतावा भरता येत होता. मात्र, मागील वर्षांपासून विलंबित परतावा भरण्याची मुदत एक वर्ष करण्यात आली आहे.

त्यामुळे असा परतावा भरण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना विविध कर्ज घेताना विवरणपत्र बँकेत सादर करावी लागतात. यामुळे ते भरण्यासाठी लगीनघाई सुरू आहे.

विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षात २०२०-२१ साठी दोन पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.

त्यातील पहिला पर्याय म्हणजे पूर्वीप्रमाणे नियमित दर असून, यामध्ये सर्व वजावट व सूट घेता येणार आहे.

दुसऱ्या नवीन पर्यायामध्ये आयकर दर कमी लागणार आहे; पण कोणतीही सूट किंवा वजावट मिळणार नाही.

त्यामुळे कर वाचविण्यासाठी विविध गुंतवणूक करून कर नियोजन करणाऱ्यांना यावर्षी दोन्हीतील कोणता पर्याय फायदेशीर ठरू शकतो, याची माहिती घेतली जात आहे. तसेच जीएसटी ऑडिटची अंतिम तारीखही ३१ मार्च आहे.

चौकट

उत्पन्नाचा परतावा भरण्याचे बरेच फायदे आहेत. आर्थिक वर्ष २०१९-२०२० साठी मिळकत परतावा ३१ मार्च २०२१ पर्यंत भरता येईल. या तारखेनंतर रिटर्न भरता येणार नाही. बँक कर्जासाठी, व्हिसासाठी आणि शासकीय कार्यालयाशी संबंधित अनेक कामांसाठी जमा होणे आवश्यक असल्याने रिटर्न ऑफ इन्कम भरणे आवश्यक आहे.

पंकज सोनी

अध्यक्ष, सीए संघटना

------

२०२०-२०२१ साठी लागू आयकर दराचे पर्याय

वार्षिक उत्पन्न जुने दर नवीन दर

(दर टक्क्यांमध्ये)

२.५० लाखांपर्यंत ० % ० %

२.५० लाख ते ५ लाख ५% ५%

५ लाख ते ७.५० लाख २०% १०%

७.५०लाख ते १० लाख २०% १५%

१० लाख ते १२.५० लाख ३०% २०%

१२.५० लाख ते १५ लाख ३०% २५%

१५ लाखांपुढे ३०% ३०%

----/

Web Title: Hurry to fill the return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.