उपसरपंच पतीने केली सरपंचाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:31 AM2017-10-04T00:31:40+5:302017-10-04T00:31:40+5:30
ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात सुरु असलेल्या शौचालयाची पाहणी केल्याच्या कारणावरुन उपसरपंचाच्या पतीने सरपंचाला मारहाण केल्याची घटना ३ आॅक्टोबर रोजी पाथरी तालुक्यातील झरी या गावात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात सुरु असलेल्या शौचालयाची पाहणी केल्याच्या कारणावरुन उपसरपंचाच्या पतीने सरपंचाला मारहाण केल्याची घटना ३ आॅक्टोबर रोजी पाथरी तालुक्यातील झरी या गावात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
झरी येथील सरपंच आसाराम तेलंगे यांनी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सुरु असलेल्या शौचालयाच्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती.
याचा राग मनात धरुन चंद्रहास शेषराव सत्वधर आणि विनायक भगवान सत्वधर यांनी ३ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावातील सार्वजनिक रस्त्यावर अडवून जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली. सरपंच तेलंगे यांच्या फिर्यादीवरुन उपसरपंच अर्चना सत्वधर यांचे पती चंद्रहास सत्वधर आणि विनायक सत्वधर यांच्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे तपास करीत आहेत.