पत्नीसह पतीलाही महापौरपदाचा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:56 AM2017-10-29T00:56:04+5:302017-10-29T00:56:10+5:30

महापालिकेच्या इतिहासात आजपर्यंत पती-पत्नीला महापौर होण्याचा मान मिळालेला नाही. घोडेले दाम्पत्य याला अपवाद ठरणार आहे.

Husband after wife becoming Mayor | पत्नीसह पतीलाही महापौरपदाचा मान

पत्नीसह पतीलाही महापौरपदाचा मान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेच्या इतिहासात आजपर्यंत पती-पत्नीला महापौर होण्याचा मान मिळालेला नाही. घोडेले दाम्पत्य याला अपवाद ठरणार आहे. रविवारी होणा-या महापौर निवडणुकीत नंदकुमार घोडेले यांच्या गळ्यात शहराचे २२ वे महापौर म्हणून माळ पडणार आहे. यापूर्वी २०१० ते २०१२ पर्यंत अनिता घोडेले यांनी महापौरपद भूषविले आहे. याशिवाय उद्या घोडेले अनेक विक्रमांचे मानकरी ठरणार आहेत.
नंदकुमार घोडेले मागील तीन दशकांपासून सेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. कोणत्याही वॉर्डातून उमेदवारी दिल्यास ते निवडून येण्याची क्षमता ठेवतात. २००० मध्ये मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांचा नक्षत्रवाडी वॉर्ड आरक्षित झाला.
सेनेने त्यांना पर्यायी वॉर्डही दिला नाही. नाइलाजास्तव त्यांनी कबीरनगर वॉर्डातून पत्नी अनिता घोडेले यांचा अपक्ष म्हणून अर्ज भरला. हा वॉर्ड ओबीसीसाठी राखीव होता. घोडेले यांनी २११ मतांनी विजय नोंदविला. अत्यंत नवख्या वॉर्डात त्यांनी १४२९ मते मिळविली होती. त्यांच्या प्रतिस्पर्धी भारिपच्या उमेदवार दीपाली कांबळे यांना १२१८ मते मिळाली होती. या निवडणुकीतही युतीला स्पष्ट बहुमत मिळालेले नव्हते.
काँग्रेस मित्रपक्षाने सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या.
अनिता घोडेले अपक्ष असल्याने काँग्रेसने त्यांना आपल्या तंबूत ओढण्यासाठी तयारी सुरू केली. ऐनवेळी त्यांना ‘मातोश्री’ निमंत्रण मिळाले. पहिल्याच टर्ममध्ये युतीच्या महापौर होण्याचे भाग्यही त्यांना मिळाले.

Web Title: Husband after wife becoming Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.