कायगावजवळील अपघातात पती ठार, पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:04 AM2021-09-24T04:04:42+5:302021-09-24T04:04:42+5:30

अहेमद पठाण आणि त्यांची पत्नी रुकसानाबी हे दोघे गुरुवारी सकाळी कावीळचे औषध घेण्यासाठी भेंडा येथे गेले होते. औषध घेतल्यानंतर ...

Husband killed, wife injured in road mishap | कायगावजवळील अपघातात पती ठार, पत्नी जखमी

कायगावजवळील अपघातात पती ठार, पत्नी जखमी

googlenewsNext

अहेमद पठाण आणि त्यांची पत्नी रुकसानाबी हे दोघे गुरुवारी सकाळी कावीळचे औषध घेण्यासाठी भेंडा येथे गेले होते. औषध घेतल्यानंतर दुचाकीवरून परताना कायगावजवळ भरधाव कंटेनर (सिजिओ-४-एनजे-४९४४) आणि त्यांच्या दुचाकीची धडक झाली. अपघातानंतर महामार्गावरील नागरिकांनी अहेमद पठाण व रुकसानाबी यांना उपचारासाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी अहेमद पठाण यांना तपासून मृत घोषित केले. या अपघातात रुकसानाबी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर गंगापुरात उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉं. विजय भिल्ल करीत आहेत. मयत अहेमद यांचा सायंकाळी दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

----- फोटो

230921\23_2_abd_124_23092021_1.jpg

कायगाव

Web Title: Husband killed, wife injured in road mishap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.