विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणारा पती, सासू, सासऱ्याला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 03:47 PM2021-03-24T15:47:37+5:302021-03-24T15:48:44+5:30

लग्नानंतर काही दिवसांनी घर बांधण्यासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत सासरची मंडळी छळ करीत होते

Husband, mother-in-law, father-in-law forced jail in wife's suicide case | विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणारा पती, सासू, सासऱ्याला सक्तमजुरी

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणारा पती, सासू, सासऱ्याला सक्तमजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देतू मला आवडत नाहीस. घरच्यांमुळे मी तुझ्याशी लग्न केले.

औरंगाबाद : घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी विवाहिता धनश्री जगदीश नागरे हिचा छळ केल्याबद्दल आणि तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याबद्दल तिचा पती जगदीश नागरे, सासरा भास्कर आणि सासू चंद्रकला यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी प्रत्येकी सात वर्षे सक्तमजुरी आणि एकूण ४५ हजार रुपये दंड ठोठावला.

कन्नड तालुक्यातील वासडी येथील शिक्षक शामराव दगडू घुगे यांची मुलगी धनश्री हिचा विवाह फुलंब्री येथील जगदीश भास्कर नागरे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी घर बांधण्यासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत सासरची मंडळी छळ करीत होत; परंतु तिची समजूत घालून तिला सासरी पाठविण्यात आले. नवऱ्याने मारले, घरातल्यांचा त्रास नकोसा झाला आहे. पप्पांना अर्जंट मला घ्यायला पाठवा, असा फोन धनश्रीने केला होता. नवरा म्हणतो की, तू मला आवडत नाहीस. घरच्यांमुळे मी तुझ्याशी लग्न केले. तू मला नको आहेस, मरून जा, असे धनश्रीने बहीण पायल हिला सांगितले होते. यानंतर तत्काळ घाटी दवाखान्यात येण्याबाबत शामराव यांना त्यांचे नातेवाईक गणेश ताठे यांचा फोन आला. ते घाटीत पोहोचले तेव्हा धनश्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे त्यांना कळले.

शामराव घुगे यांनी फिर्याद दिली. यावरून फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी वकील शरद बांगर यांनी आणि फिर्यादी शामराव घुगे यांच्यावतीने अ‍ॅड. सचिन चव्हाण यांनी बाजू मांडली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपींना धनश्रीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याबद्दल भादंवि कलम ४९८( अ ) नुसार प्रत्येकी ३ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड आणि तिच्या आत्महत्त्येस कारणीभूत झाल्याबद्दल प्रत्येकी ७ वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला.

Web Title: Husband, mother-in-law, father-in-law forced jail in wife's suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.