हुश्श...महापालिकेचा अंतिम प्रभाग आराखडा प्रसिद्ध! ३० आक्षेप मान्य, ओबीसी आरक्षणही मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 12:35 PM2022-07-21T12:35:41+5:302022-07-21T12:39:28+5:30

प्रारुपावर आराखड्यावर ३२४ जणांनी आक्षेप घेतले होते. त्यातील ३० आक्षेप आयोगाने मान्य केले.

Hush...the final ward plan of the municipality is released! 30 objections accepted, OBC reservation will also be available | हुश्श...महापालिकेचा अंतिम प्रभाग आराखडा प्रसिद्ध! ३० आक्षेप मान्य, ओबीसी आरक्षणही मिळेल

हुश्श...महापालिकेचा अंतिम प्रभाग आराखडा प्रसिद्ध! ३० आक्षेप मान्य, ओबीसी आरक्षणही मिळेल

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला प्रभाग आराखडा प्रसिद्धीपूर्वीच फुटल्याने वादंग निर्माण झाले होते. महापालिका प्रशासन आणि राज्य निवडणूक आयोगाच्या अथक परिश्रमानंतर बुधवारी अंतिम आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. प्रारुपावर आराखड्यावर ३२४ जणांनी आक्षेप घेतले होते. त्यातील ३० आक्षेप आयोगाने मान्य केले. त्यानुसार सुधारणाही करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे यांनी दिली. महापालिकेच्या सूचना फलकावर आणि झोन कार्यालयात देखील प्रभागांचा नकाशा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नऊ प्रभागांच्या नाव, व्याप्ती, वर्णनात बदल

प्रभाग क्रमांक ५ (बेगमपुरा, जयसिंगपूरा – भागश:, नंदनवन कॉलनी, शांतीपुरा, भीमनगर - उत्तर - भागश:, पेठेनगर, भावसिंगपुरा), प्रभाग क्रमांक ७ (भडकलगेट, जयभीमनगर, घाटी, आसिफिया कॉलनी, पानचक्की, कोतवालपुरा), प्रभाग क्रमांक १२ (हत्तेसिंगपुरा, किराडपुरा), प्रभाग क्रमांक १७ (एन १, एमआयडीसी चिकलठाणा), प्रभाग क्रमांक १९ (आविष्कार कॉलनी, एन -६ , गणेश नगर), प्रभाग क्रमांक २२ (राजाबाजार, औरंगपुरा, नवाबपुरा), प्रभाग क्रमांक २५ (पदमपुरा, वेदांतनगर, बन्सीलालनगर, क्रांतीनगर), प्रभाग क्रमांक २७ (ज्योतीनगर, उस्मानपुरा, क्रांतीचौक), प्रभाग क्रमांक ३३ (गजानन नगर, न्यू हनुमान नगर, विश्रांतीनगर, जयभवानीनगर) या प्रभागांचा समावेश आहे.

२१ प्रभागांच्या हद्दींमध्ये सुधारणा

प्रभाग क्रमांक १ (हर्सूल), प्रभाग क्रमांक २ (कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडी), प्रभाग क्रमांक १० (अल्तमश कॉलनी, बारी कॉलनी, किराडपुरा, कैसर कॉलनी), प्रभाग क्रमांक ११ (मुजीब कॉलनी, शहाबाजार, चेलीपुरा, शरीफ कॉलनी), प्रभाग क्रमांक १४ (स्वामी विवेकानंद नगर, भारतमाता नगर, रोजाबाग, गणेश कॉलनी), प्रभाग क्रमांक १६ (नारेगाव, आंबेडकर नगर), प्रभाग क्रमांक १७ (एन-१, एमआयडीसी चिकलठाणा), प्रभाग क्रमांक २१ (संजयनगर, खासगेट, भवानीनगर), प्रभाग क्रमांक २२ (राजाबाजार, औरंगपुरा, नवाबपुरा), प्रभाग क्रमांक २३ (कैलासनगर, सिल्लेखाना, खोकडपुरा, अजबनगर), प्रभाग क्रमांक २४ (समर्थनगर, नागेश्वरवाडी, कोटला कॉलनी), प्रभाग क्रमांक २७ (ज्योतीनगर, उस्मानपुरा, क्रांतीचौक), प्रभाग क्रमांक २९ (शिवशंकर कॉलनी, बालाजीनगर, विष्णूनगर), प्रभाग क्रमांक ३१ (मेहेरनगर, गारखेडा, विद्यानगर, न्यायनगर), प्रभाग क्रमांक ३२ (ठाकरेनगर एन २ सिडको, एन ३, एन ४ सिडको), प्रभाग क्रमांक ३३ (गजानननगर, न्यू हनुमाननगर, विश्रांतीनगर, जयभवानीनगर), प्रभाग क्रमांक ३४ (मुकुंदवाडी, महालक्ष्मी कॉलनी), प्रभाग क्रमांक ३९ (प्रियदर्शिनी इंदिरानगर, रामकृष्णनगर, लक्ष्मीनगर, मोरेश्वर हौसिंग सोसायटी), प्रभाग क्रमांक ४१ (सातारा गाव, मधुकरनगर, आमेरनगर), प्रभाग क्रमांक ४२ (कांचनवाडी, नक्षत्रवाडी, राहुलनगर, सादातनगर, ईटखेडा).

Web Title: Hush...the final ward plan of the municipality is released! 30 objections accepted, OBC reservation will also be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.