हायब्रीड जातींनी संपविले ‘फूल आणि फुलांवरील भ्रमरांचे नाते’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 11:36 AM2020-02-14T11:36:03+5:302020-02-14T11:39:21+5:30

ना कोणता सुगंध, ना त्यामध्ये कोणता मकरंद...

Hybrid breeds ends relation between flowers and insects | हायब्रीड जातींनी संपविले ‘फूल आणि फुलांवरील भ्रमरांचे नाते’

हायब्रीड जातींनी संपविले ‘फूल आणि फुलांवरील भ्रमरांचे नाते’

googlenewsNext
ठळक मुद्देगुलाब फुलांपासून दूर जात आहेत, भ्रमर आणि इतर कीटकमहाराष्ट्रात गावरान गुलाबासाठी पोषक वातावरण नाही.

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : ‘व्हॅलेंटाईन डे’ची सगळ्यात सोपी, सुंदर आणि स्वस्तातील भेट म्हणजे गुलाबाची फुले. या फु लांमुळे दोन प्रेमी जीव एकत्र येत असले तरी ‘फूल आणि फुलांवरील भ्रमर’ हे नाते मात्र कायमचे दुरावत आहे. ना कोणता सुगंध, ना त्यामध्ये मकरंद. यामुळे बागेत फुललेले शेकडो हायब्रीड गुलाब पाहूनही बिचाऱ्या भ्रमराची परिस्थिती मात्र ‘दुरून फुले साजिरे’ अशीच आहे.

गावराण गुलाब आता बघायलाही मिळत नसल्यामुळे गुलाबालाही सुगंध असतो, हे येणारी पिढी कदाचित विसरूनही जाईल. वरवर बघता हा प्रकार अगदी किरकोळ वाटत असला, तरी याचा दूरगामी परिणाम फुलांवर वाढणारे भ्रमर, मधमाशा आणि पराग कणांचे सिंचन करणाऱ्या कीटकांच्या अनेक जाती- प्रजाती यांच्यावर होतो आहे. हा एक अतिसुक्ष्म रुपातील पर्यावरणीय परिणाम आहे, असे पर्यावरण अभ्यासक सांगतात. फुले आणि त्यातही गुलाबांच्या फुलांना कायमच मागणी असते. गावरान गुलाबासाठी १५ डिग्री सेल्सिअस इतके कमी तापमान लागते. त्यामुळे महाराष्ट्रात गावरान गुलाबासाठी पोषक वातावरण नाही. म्हणूनच वाढती मागणी आणि पुरवठा यात समतोल साधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हायब्रीड गुलाब वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. व्हॅलेंटाईन डे, लग्नसराई, सणासुदीचे दिवस या काळात तर मागणी खूप जास्त वाढलेली असते. त्यामुळे एका गुलाबासाठी साधारण १५ ते २० रुपये एवढी किंमत मोजावी लागते.

रसायनांचा अधिक मारा
गावरान गुलाब हा कोणत्याही औषधाविना येतो. मात्र त्याचे आयुष्य कमी असल्यामुळे  आज बाजारात ८० ते ९० टक्के हायब्रीड  गुलाबच दिसतो आहे. आपल्या पुढच्या पिढीला गावरान गुलाब कदाचित बघताही येणार नाही. रसायनांच्या वापरामुळे हायब्रीड गुलाब जास्त टिकतात. पण रसायनांच्या अतिवापरामुळे या फुलांमधील मकरंद गावरान फुलांप्रमाणे नसतो. त्यामुळे भुंगे किंवा अन्य कीटकांचा त्यावर निभाव लागणे शक्य होत नाही. रसायनयुक्त मकरंद मधमाशांसाठी प्राणघातक ठरतो. शास्त्रज्ञ आइनस्टाईनच्या मते मधमाशा नष्ट झाल्या तर अवघ्या चार वर्षांत मानवी जात नष्ट होऊ शकते, यावरून या गोष्टीचे गांभीर्य लक्षात येते.                    
- मिलिंद गिरधारी

भ्रमरांचा रसभंग
हायब्रीड गुलाबांमध्ये इसेन्शिअल अ‍ॅरोमॅटिक आॅईलच्या ग्लॅण्डस् एकतर नसतात किंवा मग फार कमी असतात. मकरंद कमी असतो. त्यामुळे पराग सिंचन करणारे  कीटक याठिकाणी येत नाहीत. आले तरी आॅईल आणि मकरंद न मिळाल्याने त्यांचा भ्रमनिरास होतो. हायब्रीड फुले फक्त  शोभिवंत असतात. त्यातून त्यांना काहीही मिळत नाही. पण मराठवाड्यातील तापमान आणि आजची फु लांची गरज पाहता, हायब्रीड फुले लावणे गरजेचे झाले आहे. 
- प्रा. अरविंद धाबे 

Web Title: Hybrid breeds ends relation between flowers and insects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.