हायब्रीड लसूण दिसायलाच देखणा, तर गावरान लसणाची चव न्यारी किंमत भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 06:24 PM2021-12-11T18:24:17+5:302021-12-11T18:25:02+5:30

garlic farming: हायब्रीड लसूण दिसण्यास चांगला आणि स्वस्तही असल्याने अनेक ग्राहक त्याकडे आकर्षित होतात.

Hybrid garlic is beautiful to look at, while the taste of Gavaran garlic is very expensive | हायब्रीड लसूण दिसायलाच देखणा, तर गावरान लसणाची चव न्यारी किंमत भारी

हायब्रीड लसूण दिसायलाच देखणा, तर गावरान लसणाची चव न्यारी किंमत भारी

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : हिवाळ्यात जास्त लसूण खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देत असतात. कारण, लसूण खाल्ल्याने शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बाजारात मात्र लसून ५० ते २०० रुपये किलोदरम्यान मिळत आहे. मग नक्की कोणता लसूण खरेदी करावा, असा संभ्रम नवग्राहकांना पडतो. मात्र, हायब्रीड लसूण दिसण्यास चांगला आणि स्वस्तही असल्याने अनेक ग्राहक त्याकडे आकर्षित होतात. पण गावरान लसणाची ( garlic farming ) चव हायब्रीडला येत नाही. महाग असला तरी गावरान लसणाची चव न्यारी असल्याने त्याची किंमतही भारीच असते.

गावरान २००, हायब्रीड १३० रुपये किलो
हायब्रीड लसूण १३० रुपये किलोने विकली जात आहे. मात्र, हायब्रीडपेक्षा गावरान लसूण चांगला असल्याचे व उत्पादनही कमी असल्याने हा लसूण २०० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात नवीन लसणाची आवक सुरु होईल तेव्हा भाव कमी होतील.

परराज्यातून येतोय हायब्रीड लसूण
जाधववाडी कृउबा समितीच्या आडत बाजारात हायब्रीड लसूण सुरत, अहमदाबाद, इंदूर या महानगरांतून आणला जातो. तर गावरान लसूण गणोरी, फुलंब्री, भालगाव, आपतगाव तसेच जालना जिल्ह्यातील बदनापूर आदी ग्रामीण भागातून येतो.

मागणी गावरानलाच
हायब्रीड लसूण स्वस्त असला तरी ग्राहक गावरान लसूण आवर्जून खरेदी करतात. कारण गावरान लसणाची चव अधिक चांगली असते. अनेक ग्राहकांना गावरान व हायब्रीड लसणातील फरक कळत नाही. डॉक्टरांनी सांगितले गावरान लसून खा. तोच लसून द्या, असे ग्राहक सांगत असतात. फोडणी देताना गावरान लसणाचा सुगंध दरवळतो, तसा हायब्रीड लसणाचा सुगंध कमी येतो.
- रोहिणी पुंड, भाजी विक्रेता

वर्षभरातील तेजी-मंदी (किलो)
महिना -- गावरान -- हायब्रीड
जानेवारी ५०-८० रु ३०-५० रु
फेब्रुवारी ५०-८० रु ३०-५० रु
मार्च ५०-८० रु ३०-५० रु
एप्रिल ६०-९० रु ४०-६० रु
मे ६०-९० रु ४०-६० रु
जून ९०-१०० रु ५०- ७० रु
जुलै १००- १५० रु ५०-१०० रु
ऑगस्ट १३०- १८०रु ५०- १४० रु
सप्टेंबर १५०-२०० रु ५०- १५० रु
ऑक्टोबर १५०-२०० रु ५०-१५० रु
नोव्हेंबर १५०-२०० रु ५०-१३० रु
डिसेंबर १५०-२०० रु ५०-१३० रु

Web Title: Hybrid garlic is beautiful to look at, while the taste of Gavaran garlic is very expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.