'मला जीवनाचा कंटाळा आलाय', विद्यार्थीनीने वसतीगृहात केली आत्महत्या
By योगेश पायघन | Published: August 26, 2022 07:00 PM2022-08-26T19:00:56+5:302022-08-26T19:01:09+5:30
देवगिरी महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहात तिसऱ्या मजल्यावर रूम नंबर- ४४ मध्ये ही घटना घडली.
औरंगाबाद : 'जीवन हे सुंदर आहे. ते जगले पाहीजे. मला जीवनाचा कंटाळा आलाय', अशा आशयाची चिठ्ठी लिहून बीकाॅम प्रथम वर्षात शिकत असलेल्या २० वर्षीय विद्यार्थीने वसतीगृहात गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास उघड झाली. आरती सर्जेराव कोल्हे ( २०, रा. गुरूपींप्री, ता. घनसावंगी जि. जालना) असे मयत विद्यार्थीनीचे नाव आहे.
आरती शांत स्वभावाची होती. फारशी बोलत नव्हती. तीला नैराश्य का आले. या घटनेच्या मागील कारणाचा शोध वेदांतनगर पोलीस घेत आहेत. असून तिच्या मृत्यूमुळे विद्यार्थीनींतून हळहळ व्यक्त होत आहे. देवगिरी महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहात तिसऱ्या मजल्यावर रूम नंबर- ४४ मध्ये ही घटना घडल्याचे वेदांतनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षण सचिन सानप यांनी सांगितले. आरतीजवळ एक चिठ्ठी सापडली असून त्यात जीवना विषयी तिने बरच काही लिहीले आहे. रूम मध्ये कोणीच नसतांना शालच्या सह्याने पंख्याला तिने गळफास घेतला.