औरंगाबादेतील प्रसिद्ध वेरुळ लेणी पाहून मला खूप आनंद झाला- हिलरी क्लिंटन

By संतोष हिरेमठ | Published: February 9, 2023 01:20 PM2023-02-09T13:20:37+5:302023-02-09T13:31:04+5:30

अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर होत्या.

I am very happy to see the Verul caves and historical places in aurangabad - Hillary Clinton | औरंगाबादेतील प्रसिद्ध वेरुळ लेणी पाहून मला खूप आनंद झाला- हिलरी क्लिंटन

औरंगाबादेतील प्रसिद्ध वेरुळ लेणी पाहून मला खूप आनंद झाला- हिलरी क्लिंटन

googlenewsNext

औरंगाबाद : भारतातील महत्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक असलेल्या औरंगाबादमधील लेण्या पाहून खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन  यांनी व्यक्त केली. त्या तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यानंतर आज औरंगाबादहून वाराणसीकडे रवाना होत आहे. खुलताबादहून त्यांच्या वाहनांचा ताफा  चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला.   वाहनातून उतरून त्या विमानतळाच्या आत गेल्या.

विमानतळावरून हिलरी क्लिंटन  रवाना होताना पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. शहराच्या हद्दीपर्यंत शहर पोलिसांची सुरक्षा तैनात करण्यात आली होती. ग्रामीण-हद्दीत ग्रामीण पोलिसांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. ग्रामीण पोलिस दलातील १०० हून अधिक कर्मचारी व दहा ते पंधरा पोलिस अधिकारी तैनात करण्यात आला.

Web Title: I am very happy to see the Verul caves and historical places in aurangabad - Hillary Clinton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.