मी स्वतः सगळीकडे दौरा करणार; नुकसानीचे १५ दिवसात पंचनामे होतील: अब्दुल सत्तार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 14:58 IST2022-10-21T14:57:20+5:302022-10-21T14:58:01+5:30
मका, कापूस सोयाबीन नुकसान झालंय, कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भावना समजून घेत आहेत.

मी स्वतः सगळीकडे दौरा करणार; नुकसानीचे १५ दिवसात पंचनामे होतील: अब्दुल सत्तार
- अमेय पाठक
औरंगाबाद: मी स्वतः सगळीकडे दौरा करणार असून, एकही शेतकरी भरपाई पासुन वंचित राहणार नाही. तसेच येत्या 15 दिवसांत पंचनामे होतील अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलीय.
मका, कापूस सोयाबीन नुकसान झालंय, कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भावना समजून घेत आहेत. अनेक जिल्ह्यात ढगफुटी, पावसाने नुकसान केले आहे. पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे हा पर्याय नाही. पंचनामे करण्यासाठी सॅटेलाईट पाहणी पद्धत तयार करतोय. भविष्यातील अडचणी यातून दूर होतील. मात्र, यावेळेस ग्राउंड वर जाऊनच पंचनामे करावे लागतील असेही कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
पीक विमा कंपनी सुलतानी संकट निर्माण करताय, 72 तासात नुकसान कळवणे शक्य नाही, ऑफलाईन तक्रार सुद्धा देत यायला हवी, कुणी उशिरा माहिती दिली तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती घ्यावी लागेल, पीक विमा कंपनी मनमानी करू शकणार नाही, असेही मंत्री सत्तार यांनी म्हटले.