आयसीएफकडून माऊंट फ्रेंडशिप मोहीम फत्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:11 AM2019-05-18T00:11:57+5:302019-05-18T00:13:04+5:30
इंडियन कॅडेट फोर्स (आयसीएफ) आणि जिल्हा अॅडव्हेंचर स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते १५ मे यादरम्यान आयोजित १७ हजार ३४६ फूट उंचीवरील माऊंट फ्रेंडशिप शिखर सर करीत मोहीम औरंगाबाद येथील आयसीएफच्या ५ गिर्यारोहकांनी फत्ते केली. विशेष म्हणजे १२ वर्षीय रिया नरवडे हिनेदेखील १६ हजार फूट उंचीपर्यंत यशस्वी चढाई करण्याचा पराक्रम केला.
औरंगाबाद : इंडियन कॅडेट फोर्स (आयसीएफ) आणि जिल्हा अॅडव्हेंचर स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते १५ मे यादरम्यान आयोजित १७ हजार ३४६ फूट उंचीवरील माऊंट फ्रेंडशिप शिखर सर करीत मोहीम औरंगाबाद येथील आयसीएफच्या ५ गिर्यारोहकांनी फत्ते केली. विशेष म्हणजे १२ वर्षीय रिया नरवडे हिनेदेखील १६ हजार फूट उंचीपर्यंत यशस्वी चढाई करण्याचा पराक्रम केला.
हिमालय पर्वत रांगेतील माऊंट फ्रेंडशिप हे शिखर सर करण्यासाठी आयसीएफचे पथक १ मे रोजी औरंगाबाद येथून रवाना झाले होते. माऊंट फ्रेंडशिप मोहिमेत आयसीएफच्या पथकात शिखर कन्या व गत वर्षी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करणारी प्रा. मनीषा वाघमारे, किशोर नावकर, राहुल अहिरे, सूरज सुलाने, शोएब पठाण, डॉ. प्रशांत काळे, विनोद विभूते, कविता जाधव, आरती चिल्लारे, रिया नरवडे, इशिता हिवर्डे, प्रेरणा पंडागळे, श्रद्धा कोळी, अर्थ अग्रवाल सहभागी झाले
होते. यापैकी किशोर नावकर, सूरज सुलाने, प्रशांत काळे, आरती खिल्लारे व प्रेरणा पंडागळे यांनी माऊंट फ्रेंडशिप शिखर सर केले व उर्वरीत जणांनी १६000 ते १६५00 फूट उंचीपर्यंत यशस्वी चढाई केली. हे पथक सुरुवातीला प्रथम मनाली येथे पोहोचले. बुरवा येथे २ दिवस वातावरणाशी एकरूप होण्यासाठी या पथकाने सराव केला. मोहीम फत्ते केल्यानंतर आयसीएफचे हे पथक नुकतेच औरंगाबादला पोहोचले. या मोहिमेला रवाना होण्याआधी या गिर्यारोहकांना आयसीएफचे कमांडर विनोद नरवडे यांनी मार्गदर्शन
केले. मोहीम फत्ते करणाऱ्या आयसीएफच्या गिर्यारोहकांचे प्रभूलाल पटेल, नंदू पटेल, फुलचंद सलामपुरे, दयानंद कांबळे, अमृत बिºहाडे, बाबूराव गंगावणे, सुनील कोळी, डॉ. पंकज अग्रवाल, डॉ. नीलिमा अग्रवाल, सतीश पंडागळे, रत्नदीप देशपांडे, अजय वाहूळ, चेतन सरवदे, विशाल काकडे आदींनी अभिनंदन केले.
मोहिमेआधी केला कसून सराव
मोहिमेस प्रत्यक्ष चढाई करण्याआधी हे पथक ११ हजार ५०० फुटांवर असलेल्या बखरताज बेस कॅम्पला पोहोचले. वेगाने वाहणारा वारा, बर्फवृष्टी आणि पावसाला सामोरे जात या पथकाने २ दिवस बर्फात चालण्याचा, उतरणाºया व हाईट गेनिंगसाठी कॅम्प १ पर्यंत जाऊन पुन्हा परतण्याचा सराव केला.
गाईड बुद्धिप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली ८ मे रोजी पहाटे ४ वाजता बेस कॅम्पवरून चढाईस सुरुवात केली व दुपारी २ वाजून १९ मिनिटांनी माऊंट फ्रेंडशिप शिखरावर तिरंगा आणि आयसीएफचा झेंडा फडकावला.