छत्रपती संभाजीनगर मनपाने लावली आयडिया; रोबोटने शोधले ५४ अनधिकृत नळ कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 11:17 IST2025-03-01T11:16:09+5:302025-03-01T11:17:59+5:30

सिल्क मिल कॉलनी भागात मनपाच्या १५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर अनधिकृत नळ सापडले.

Idea implemented by Chhatrapati Sambhajinagar Municipality; The robot detected 54 unauthorized tap connections | छत्रपती संभाजीनगर मनपाने लावली आयडिया; रोबोटने शोधले ५४ अनधिकृत नळ कनेक्शन

छत्रपती संभाजीनगर मनपाने लावली आयडिया; रोबोटने शोधले ५४ अनधिकृत नळ कनेक्शन

छत्रपती संभाजीनगर : शहरात अनधिकृत नळ कनेक्शनची संख्या लाखोंच्या घरात आहे. ज्यांनी अधिकृत नळ घेतले त्यातील ८० टक्के नागरिक पाणीपट्टीही भरत नाहीत. त्यामुळे महापालिकेने बुधवारी अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याची माेहीम सुरू केली. शुक्रवारी सिल्क मिल कॉलनी भागात एकाच जलवाहिनीवरील तब्बल ५४ नळ शोधून काढले. सर्व कनेक्शन खंडित करून प्रत्येक नागरिकाकडून ५ हजार रुपयांप्रमाणे २ लाख १३ हजार दंड वसूल केला.

महापालिकेच्या रेकॉर्डवर ३ लाखांहून अधिक मालमत्तांची नोंद आहे. यातील किमान ८० टक्के मालमत्ताधारकांकडे एक किंवा दोन नळ कनेक्शन असावेत असा मनपाचा अंदाज आहे. मनपाच्या रेकॉर्डवर फक्त १ लाख २५ हजार नळ कनेक्शनची नोंद आहे. उन्हाळ्यात सर्वाधिक ओरड अनधिकृत नळ कनेक्शनधारकांकडून होते. पूर्वी पाणीपट्टी ४ हजार ५० रुपये होती. आता ती २ हजार २५ रुपये केली, तरी नागरिक पाणीपट्टी भरत नाहीत. १८ ते २२ कोटी रुपये पाणीपट्टीतून वसूल होतात. दरवर्षीद पाणीपुरठ्यात ७५ ते ८० कोटींची तूट मनपा सहन करते.

रोबोटचा वापर सुरू
रेल्वे स्टेशन भागातील शाहशोख्तामियाँ दर्गा, सिल्क मिल कॉलनी येथे जुन्या १५० मिमी जलवाहिनीवर पाणीपुरवठा होत नसल्याने काही चोकअप असल्याची शंका होती. रोबोट तंत्रज्ञान वापरून शोध घेतल्यावर जलवाहिनीवर चुकीच्या पद्धतीने आणि अनधिकृत नळ कनेक्शनचे मोठे जाळे असल्याचे लक्षात आले. ५४ नळ कनेक्शन खंडित केले. प्रत्येकी पाच हजार दंड ठोठावला. २ लाख १३ हजार ३५० रुपये नागरिकांकडून वसूल करण्यात आले. ही कारवाई कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांच्या नेतृत्वाखाली उपअभियंता महेश चौधरी, पथक अभियंता रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता अमित पंडागळे, लाइनमन शेख कासीम, ईसा खान, पथक कर्मचारी तमीज पठाण, वैभव भटकर, तुषार पोटपिल्लेवार, स्वप्निल पाईकडे आणि सागर डिघोळे यांनी केली.

Web Title: Idea implemented by Chhatrapati Sambhajinagar Municipality; The robot detected 54 unauthorized tap connections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.