कच-यावर प्रक्रिया करण्याचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:33 AM2017-11-14T00:33:45+5:302017-11-14T00:33:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : नारेगाव येथील कचरा डेपो हलविण्याच्या मुद्याबाबत प्रशासकीय यंत्रणा गांभीर्याने विचार करू लागली आहे. नारेगाव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नारेगाव येथील कचरा डेपो हलविण्याच्या मुद्याबाबत प्रशासकीय यंत्रणा गांभीर्याने विचार करू लागली आहे. नारेगाव येथील कच-यावर प्रक्रिया करण्याबाबत आणि वॉर्डनिहाय डम्पिंग ग्राऊंडचा पर्याय सोमवारी झालेल्या बैठकीत चर्चेला आला.
विभागीय आयुक्तालयात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
नवी मुंबई मनपातील अधिकाºयांचे शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित होते. तेथील कचºयाची समस्या, डम्पिंग गाऊंड, ओला व सुका कच-याच्या विल्हेवाटीसाठी वापरण्यात येणा-या बॅग्सबाबत त्या बैठकीत मंथन झाले. नवी मुंबई येथील कचºयाचे व्यवस्थापन पाहण्यासाठी व तेथील प्रकल्प समजून घेण्यासाठी मनपाचे शिष्टमंडळ तिकडे जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी नवी मुंबईतील प्रयोगाबाबत सर्व माहिती जाणून घेतली. तसेच स्मार्ट सिटीमध्ये ४६ कोटी रुपयांची तरतूद कचरा व्यवस्थापनासाठी आहे, त्याचा उपयोग यासाठी करण्यात येण्यावर बैठकीत चर्चा झाली.
विभागीय आयुक्त डॉ.भापकर म्हणाले, कचरा व्यवस्थापन ही सर्वांचीच जबाबदारी आहे. १० लाख मेट्रिक टन कचरा नारेगावमधील डेपोमध्ये जमिनीत शास्त्रशुद्धरीत्या पुरला. यापुढे जास्तीचा कचरा तेथे सॅण्डफिल करणे शक्य नाही. मनपाला याबाबत निर्णय घ्यावा लागेल. कचरा डेपोसाठी पर्यायी जागा पालिकेला शोधून देण्यापर्यंत प्रशासनाची भूमिका आहे.