कैद्यांना इलेक्ट्रॉनिक टॅगिंग करण्याचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 10:09 PM2018-11-01T22:09:09+5:302018-11-01T22:10:21+5:30

कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडणाऱ्या कैद्यांवर कायमस्वरूपी निरीक्षण ठेवण्यासाठी त्यांना इस्रायली कैद्यांप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स टॅगिंग करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती कारागृह मध्य विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी येथे दिली.

Ideas for electronic tagging in prisoners | कैद्यांना इलेक्ट्रॉनिक टॅगिंग करण्याचा विचार

कैद्यांना इलेक्ट्रॉनिक टॅगिंग करण्याचा विचार

googlenewsNext
ठळक मुद्देकारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांची माहिती : हर्सूल कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन

औरंगाबाद : कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडणाऱ्या कैद्यांवर कायमस्वरूपी निरीक्षण ठेवण्यासाठी त्यांना इस्रायली कैद्यांप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स टॅगिंग करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती कारागृह मध्य विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी येथे दिली.
हर्सूल कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी कारागृह परिसरात उपमहानिरीक्षक देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, गुन्हा केल्यानंतर कैद्यांना कारागृहात पाठविले जाते. मात्र, कारागृहात आलेला कैदी सुधारला पाहिजे. त्याने जेलमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा कोणताही गुन्हा करू नये, असे शासनाला वाटते. कारागृह हे शिक्षा केंद्र मानले जात असले तरी येथे अकुशल कैद्यांना कुशल कारागीर बनविण्याचे काम केले जाते. यामुळे कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी इस्रायल देशांप्रमाणे येथील कैद्यांना टॅगिंग करण्याचा विचार होत आहे. मात्र, याला मान्यता मिळते अथवा नाही, हे भविष्यात समोर येईल. कारागृह सुरक्षेसंदर्भात महाराष्ट्र शासन आणि इस्रायल यांच्यात करार झाला आहे. याअंतर्गत कारागृह आणि कैदी यांची सुरक्षा याबाबत विविध पावले उचलली जाणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर नागपूर कारागृहातील सुरक्षा यंत्रणेत बदल केला जाणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी कारागृह अधीक्षक बी.आर. मोरे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, तुरुं गाधिकारी आशिष गोसावी, महाजन उपस्थित होते. अधीक्षक मोरे यांनी प्रास्तविक केले. पंचशीला चव्हाण यांनी संचलन केले, तर आभार मुळे यांनी मानले.

Web Title: Ideas for electronic tagging in prisoners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.