सूप व दुरड्यांपासून साकारलीय ‘श्रीं’ची मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:12 AM2017-08-27T00:12:20+5:302017-08-27T00:12:20+5:30

शहरातील बुरुड गल्लीतील ‘श्री’ बालगणेश मंडळ बुरुड समाज दरवर्षी गणरायाच्या विविध फळा पासून तसेच वेग- वेगळ्या वस्तूपासून मूर्ती बनविणारे गणेश मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे. तसेच या मंडळांनी बनविलेल्या मूर्ती खरोखरच आकर्षण ठरतात. मागील १९ वर्षापासून या मंडळातर्फे गणरायाची स्थापना केली जाते.

 The idol of 'Shri' from the soup and scales | सूप व दुरड्यांपासून साकारलीय ‘श्रीं’ची मूर्ती

सूप व दुरड्यांपासून साकारलीय ‘श्रीं’ची मूर्ती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील बुरुड गल्लीतील ‘श्री’ बालगणेश मंडळ बुरुड समाज दरवर्षी गणरायाच्या विविध फळा पासून तसेच वेग- वेगळ्या वस्तूपासून मूर्ती बनविणारे गणेश मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे. तसेच या मंडळांनी बनविलेल्या मूर्ती खरोखरच आकर्षण ठरतात. मागील १९ वर्षापासून या मंडळातर्फे गणरायाची स्थापना केली जाते.
या मंडळातर्फे दरवर्षी नवनवीन कल्पना श्रीच्या मूर्तीच्या रुपात उतरविल्या जातात. मागील वर्षीही आलूपासून बनविलेली गणरायाची मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरली होती. तसेच यंदाही १० सूप आणि २०० दुरड्यांपासून श्रींची साडेपाच फुटांची मूर्ती अवघ्या तीन दिवसांत साकारली आहे. दरवर्षी या मंडळाची कार्यकारिणी गठीत करतानाच यंदा साकारण्यात येणाºया मूर्तीवर प्रथम चर्चा केली जाते. तीन ते चार वस्तूंवर बैठकीत चर्चा होऊन कमी खर्चात आणि कमी वेळात होणाºया मूर्तीला सर्वानुमत्ते परवानगी दिली जाते. सूप व दुरड्यांसाठी तब्बल ७५ बांबू लागले आहेत. सांगली येथून बांबूंची मागणी केली होती.
मूर्ती अगदी साध्या पद्धतीने जरी बनविलेली असेल तरीही दुरुनच आकर्षक ठरते. त्यामुळे हे अगदी बारिक नक्षीकाम जवळ जावून पाहण्याचा मोह भक्तांना आवरत नाही. यासाठी अभया गुडमलवार, तुळशीराम उरेवार, बाबूराव जोरगेवार, गणेश उरेवार, अनिल उरेवार, रमेश उरेवार, संजय उरेवार, गजानन उरेवार, शंकर गुडमलवार, राजू गुडमलवार, ईश्वर उरेवार यांच्यासह आदींनी परिश्रम घेऊन कमी वेळात गणरायाची मूर्ती साकारली आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title:  The idol of 'Shri' from the soup and scales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.