"औरंगजेबचा एवढा तिटकारा तर कबरीचा संरक्षित स्मारकाचा दर्जा काढून दाखवा"

By बापू सोळुंके | Published: June 10, 2023 07:10 PM2023-06-10T19:10:26+5:302023-06-10T19:14:39+5:30

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंचे भाजपला आव्हान

If Aurangzeb is so hated, remove the tomb's status as a protected monument, Ambadas danve challenges to BJP | "औरंगजेबचा एवढा तिटकारा तर कबरीचा संरक्षित स्मारकाचा दर्जा काढून दाखवा"

"औरंगजेबचा एवढा तिटकारा तर कबरीचा संरक्षित स्मारकाचा दर्जा काढून दाखवा"

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे फोटो झळकावणे, स्टेटसला ठेवण्यावरुन राजकारण सुरू असताना औरंगजेबाचे भूत सत्ताधारीच बाहेर काढत आहे. औरंगजेबचा एवढा तिटकारा येत असेल तर खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचा असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढून दाखवा, असे खुले आवाहन विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पार्टीला दिले. 

दानवे यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन भाजपवर टिका केली.या ट्विटमध्ये त्यांनी नमूद केले की, बाटलीतून भूत बाहेर काढावे, तसा हा औरंग्या सत्ताधारीच आज शिवरायांच्या महाराष्ट्रात उभा करत आहेत. शत्रूची भीती दाखवून मत मागण्याची तुमची जूनी सवय जनता ओळखते. मग तो औरंगजेब असो की पाकिस्तान. कारवाईची भाषा करणाऱ्यांनी संभाजीनगरात हे पोस्टर नामांतर आंदोलनात पहिल्यांदा दिसले तेव्हा त्यावर काय कारवाई केली?की विसर पडला तुम्हाला याचा? अल्पवयीन मुले यात सापडत आहेत. ते स्वत:चा मेंदू वापरुन हे कृत्य करणे शक्य वाटत नाही. त्याचा ब्रेनवॉश करणारी यंत्रणा कोण आहे?याकडे 'पार्टी विथ डिफ्रन्स' जाणीवपूर्वक नजरेआड करते. मांजर डोळे मिटून दूध पिते पण तिला जग पहात असते, हे विसरू नका. 

हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू आहे. स्वत:ला सज्जन भासवून दुसऱ्याला दुर्जन म्हणणं फार दिवस चालत नसतं. आम्हाला तर आहेच, तुम्हाला तिटकारा असेल या पापी राजाचा तर त्याच्या कबरीला असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढण्याची शिफारस करणारे एक साधे पत्र तुमच्या दिल्लीश्वर दैवताला लिहिण्याची हिम्मत तर दाखवा! असे नमूद करून भाजपला खुले आव्हान दिले आहे. दानवे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हे ट्विट केले शिवाय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशीही बोलताना त्यांनी याच विषयावर भाजपला छेडले.

Web Title: If Aurangzeb is so hated, remove the tomb's status as a protected monument, Ambadas danve challenges to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.