नगरसेवकांनी मनावर घेतले तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:02 AM2018-03-12T00:02:59+5:302018-03-12T00:03:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : कचºयावरून शहरात एकीकडे रणकंदन माजले आहे. परंतु दुसरीकडे शहरातील ठाकरेनगर व पवननगर हे वॉर्ड ...

If corporators take it in mind ... | नगरसेवकांनी मनावर घेतले तर...

नगरसेवकांनी मनावर घेतले तर...

googlenewsNext
ठळक मुद्देआदर्श उपक्रम : ठाकरेनगर, पवननगरात ओल्या कचºयापासून खतनिर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कचºयावरून शहरात एकीकडे रणकंदन माजले आहे. परंतु दुसरीकडे शहरातील ठाकरेनगर व पवननगर हे वॉर्ड असे आहेत की, त्यांना नारेगावकरांनी केलेल्या ‘कचरा कोंडी’शी काहीच सोयरसुतक नाही. या वॉर्डात मागील दोन वर्षांपासून ओल्या कचºयापासून खत तयार केला जात असून, ते शेतकºयांना मोफत दिले जात आहे.
नारेगावच नाही तर शहराच्या आसपासच्या कोणत्याही गावातील गावकरी कचरा टाकून देण्यास तयार नाहीत. नारेगावात कचरा टाकू नये, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शहरात कचरा कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोटावर मोजण्याइतकेच काही वॉर्ड शहरवासीयांसाठी मार्गदर्शक ठरले आहेत. या वॉर्डात निघणाºया कचºयाची विल्हेवाट वॉर्डातच लावली जाते. यात पवननगरात (वॉर्ड क्र.३०) २०१५ पासून वर्गीकरण करून ओल्या कचºयाचे खत तयार केले जात आहे. मागील तीन वर्षांपासून येथील नागरिक ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करूनच घंटागाडीत टाकतात. सर्व कचरा फरशी मैदानावर आणला जातो. मैदानाच्या कडेला ११ खड्डे करण्यात आले आहेत. त्यात ओला कचरा टाकण्यात येतो. सात दिवसांनंतर तयार झालेले खत शेतकºयांना मोफत दिल्या जाते. सुक्या कचºयामध्ये प्लास्टिक, लोखंड, कागद हे विक्री केले जातात. याच पद्धतीने ठाकरेनगरातील (वॉर्ड क्र. ८१) छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदानात ओल्या कचºयापासून खत तयार करण्यासाठी मोठे खड्डे के ले आहेत. येथेही दर आठवड्याला तयार झालेले खत शेतकºयांना मोफत दिल्या जाते. तसेच सुका कचरा भंगारात विकल्या जातो. हा सुका कचरा घेण्यासाठी भंगार विक्रेते मैदानात गाडी घेऊन येतात व तेथेच वजन करून त्याचे पैसे स्वच्छता कर्मचाºयांना देतात. शहरात जागोजागी कचºयाचे ढिगारे लागले असताना हे वॉर्ड स्वच्छ आहेत. येत्या काळात प्रत्येक वॉर्डात अशाच प्रकारे कचºयाचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावावी लागेल.मात्र, त्यासाठी वॉर्डाचा कायापालट करण्याचा निर्णय नगरसेवकांना घ्यावा लागणार आहे. नगरसेवक व नंतर रहिवाशांची मानसिकता बदलावी लागणार आहे. तरच कचरामुक्त व स्वच्छ शहराची कल्पना प्रत्यक्षात उतरेल. कोणत्याही नेत्याला चीनमध्ये जाण्याची गरज पडणार नाही.
दोन वर्षांपासून वॉर्डात होते कचºयाचे खत
मागील दोन वर्षांपासून ठाकरेनगर वॉर्डात आम्ही ओल्या व सुक्या कचºयाचे वर्गीकरण करीत आहोत व मनपाच्या मैदानातच कोपºयात खड्डे खोदून तेथे ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करीत आहोत. दररोज २ ते ३ टन कचºयाची येथे खतनिर्मिती केली जाते. ६ महिन्यांपूर्वी मनपाला ३५ लाख रुपयांचे बजेट असलेले प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. यात ओल्या व सुक्या कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी, सोयी-सुविधा पुरविण्यासाठीच्या उपाययोजना होत्या. मात्र, मनपा प्रशासनाने प्रस्ताव लालफितीत ठेवला आहे.
-दामूअण्णा शिंदे, माजी नगरसेवक (ठाकरेनगर वॉर्ड)
दररोज ६ टन कचºयाची योग्य पद्धतीने विल्हेवाट
मागील तीन वर्षांपासून पवननगर वॉर्डात दररोज ५.५० लाख ते ६ लाख टन कचºयाचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे. यासाठी फरशी मैदानावर ११ खड्डे तयार करण्यात आले. त्यात ४ टन ओल्या कचºयापासून खतनिर्मिती केली जाते. दररोज सुमारे ५ हजार रुपयांचा सुका कचरा (ज्यात भंगार असते) विकल्या जातो. त्याचे पैसे स्वच्छता कर्मचाºयांना वाटून दिले जातात. खत शेतकºयांना मोफत दिल्या जाते. मागील तीन वर्षांत पवननगर वॉर्डातून नारेगाव येथे कचरा पाठविण्यात आला नाही. वॉर्डातच त्याचे विघटन करण्यात आले. यासाठी नागरिकांची मानसिकता तयार करावी लागली. -नितीन चित्ते, नगरसेवक (पवननगर वॉर्ड)

Web Title: If corporators take it in mind ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.