केसीआर यांनी महाराष्ट्रात लक्ष घातलं तर, तेलंगणा पायाखालून जाईल; अंबादास दानवेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 05:41 PM2023-06-28T17:41:05+5:302023-06-28T17:41:20+5:30

महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मोठा विस्तार करण्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची योजना आहे.

If K. Chandrashekar Rao focuses on Maharashtra, Telangana will go underfoot; Criticism of Ambadas Danve | केसीआर यांनी महाराष्ट्रात लक्ष घातलं तर, तेलंगणा पायाखालून जाईल; अंबादास दानवेंची टीका

केसीआर यांनी महाराष्ट्रात लक्ष घातलं तर, तेलंगणा पायाखालून जाईल; अंबादास दानवेंची टीका

googlenewsNext

आषाढीनिमित्त विठोबाच्या दर्शन रांगेतील भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी अवघ्या दहा मिनिटात तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. तब्बल ६०० गाड्यांच्या ताफा आणि संपूर्ण मंत्रिमंडळ, आमदार, खासदारांसह के. चंद्रशेखर राव सोलापूरात दाखल झाले होते. 

महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मोठा विस्तार करण्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची योजना आहे. त्यासाठी ते दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. केसीआर यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी निशाणा साधला आहे. केसीआर यांचा सोलापूर, पंढरपूर दौरा म्हणजे फक्त दिखावा आहे. त्यांनी जर त्याचं लक्ष महाराष्ट्रात घातलं तर त्यांच्या पायाखालून तेलंगणा जाईल, असा इशारा देखील अंबादास दानवे यांनी केसीआर यांना दिला. 

महाराष्ट्रात येऊन हे शक्तिप्रदर्शन तुम्ही कोणाला दाखवत आहात?, तुमचा पक्ष तेलंगणात. तुम्ही महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन करत असताना दिल्लीत तुमचा पक्ष फुटला आहे. अनेक माजी मंत्री, अनेक माजी खासदार आणि प्रमुख नेते यांनी काल काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. हा त्यांच्या पक्षाला सर्वात मोठा हादरा आहे. त्यांचे प्रमुख लोक काँग्रेसमध्ये गेल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. 

तेलंगणातला हा जो पक्ष महाराष्ट्रात ६०० गाड्या ७०० गाड्या आणून हे पैशाचं, संपत्तीचं, सत्तेचा ओंघळवान दर्शन आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात, अशी टीकाही संजय राऊतांनी केली. तसेच केसीआर यांचा पक्ष भाजपाची बी टीम आहे. राज्याची जनता सुज्ञ आहे, असा आरोपही संजय राऊतांनी केला. 

महाराष्ट्रातील सर्व जागा लढविणार

महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बीआरएस पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. बीआरएस पक्ष हो शेतकऱ्यांचा पक्ष आहे. बीआरएस पक्ष सत्तेत आल्यास भगीरथ भालके यांना मंत्रिपद देऊ. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपवू, अशी घोषणा चंद्रशेखर राव यांनी केली.

{{{poll_id####10eae982-b5e2-488c-a9b2-adb2d944f978}}}}

Web Title: If K. Chandrashekar Rao focuses on Maharashtra, Telangana will go underfoot; Criticism of Ambadas Danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.