क्रीडा विद्यापीठास जागा कमी पडली तर जमीन विकत घेऊ, लवकरच भूमिपूजन होईल : अतुल सावे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 12:51 PM2022-08-29T12:51:19+5:302022-08-29T12:51:36+5:30

राष्ट्रीय क्रीडा दिन : ४५३ खेळाडू, मार्गदर्शकांचा सत्कार, ऑलिम्पियन दत्तू भोकनळ यांच्या हस्ते गौरव

If there is shortage of space for sports university, we will buy land, Bhumi Pujan will be done soon: Atul Save | क्रीडा विद्यापीठास जागा कमी पडली तर जमीन विकत घेऊ, लवकरच भूमिपूजन होईल : अतुल सावे

क्रीडा विद्यापीठास जागा कमी पडली तर जमीन विकत घेऊ, लवकरच भूमिपूजन होईल : अतुल सावे

googlenewsNext

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच क्रीडा विद्यापीठाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. क्रीडा विद्यापीठासाठी सरकारी जागा कमी पडल्यास जमीन विकत घेऊ, अशी घोषणा राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी रविवारी केली. औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने खेळाडूंच्या सत्कार सोहळ्यानिमित्त त्यांनी ही घोषणा केली.

यावेळी अतुल सावे आणि ऑलिम्पियन दत्तू भोकनळ यांच्या हस्ते ४५३ खेळाडू, क्रीडा शिक्षक व मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते खो-खो खेळासाठी अविरत कार्य करणारे रमेश भंडारी यांचा मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष उदय डोंगरे, डॉ. मकरंद जोशी, अभय देशमुख, डॉ. दिनेश वंजारे, विश्वास जोशी, डॉ.अब्दुल कादिर, दयानंद कांबळे, हेमेंद्र पटेल, डॉ. संदीप जगताप, अमृत बिऱ्हाडे आदी उपस्थित होते.

खेळाडूंनी सकारात्मक राहायला हवे. त्यांच्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. खेळाडूंनी आपल्या मेहनतीकडे अधिक लक्ष दिले तर खेळाडूला त्याचा फायदाच होतो, असे दत्तू भोकनळ यांनी यावेळी सांगितले. डॉ. नीलेश गाडेकर (सोयगाव), नीलेश गायकवाड (पैठण), बाबासाहेब माने (सिल्लोड), विजय बारवाल (कन्नड), भाऊसाहेब खरात (वैजापूर), नामदेव पवार (फुलंब्री), कैलास वाहूळे (औरंगाबाद), राजेंद्र गंगावणे (खुलताबाद), नीलेश माने (गंगापूर) यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू : अदिती निलंगेकर (पॅरा ऑलिम्पिक), सृष्टी साठे (सुवर्णपदक, आशियाई कनिष्ठ बॉक्सिंग), शर्वरी कल्याणकर (सुवर्णपदक, आशियाई कनिष्ठ बॉक्सिंग), तनिशा बोरामणीकर (रौप्यपदक, आशियाई बुद्धिबळ), गौरव म्हस्के (कांस्यपदक, आशियाई ज्युनियर बॉक्सिंग), कशीष भराड (आशियाई तलवारबाजी), वैदेही लोया (आशियाई तलवारबाजी), साक्षी चितलांगे (रौप्यपदक, आशियाई बुद्धिबळ), तेजस शिरसे (आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा), रिद्धी हत्तेकर, सिद्धी हत्तेकर (आशियाई जिम्नॅस्टिक स्पर्धा), अभय शिंदे (आशियाई तलवारबाजी), श्रेयस जाधव (आशियाई तलवारबाजी), आयर्नमॅन संदीप गुरमे (युरोपियन चॅम्पियनशिप ), श्रद्धा चोपडे (आशियाई स्पर्धेत कांस्य) यांच्यासह विविध खेळांतील ४५३ राष्ट्रीय खेळाडू, ५७ क्रीडा मार्गदर्शकांचा देखील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.दिनेश वंजारे, विश्वास जोशी, डॉ.अब्दुल कादिर, डॉ.दयानंद कांबळे, डॉ.संदीप जगताप, अमृत बिऱ्हाडे आदींनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने गौरविण्यात आलेल्या जिल्ह्यातील आंतराष्ट्रीय खेळाडू व आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारार्थींसोबत सहकारमंत्री अतुल सावे, ऑलिंपियन दत्तू भोकनळ, रमेश भंडारी, पंकज भारसाखळे, डॉ.उदय डोंगरे, डॉ.मकरंद जोशी, पोलीस निरीक्षक सुरेश गिरमे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेकर घुगे, अब्दुल कादिर आदी. खो-खो खेळाच्या उद्धारासाठी तब्बल पन्नास वर्षे अविरत कार्य करणारे रमेश भंडारी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रधान करतांना सहकारमंत्री अतुल सावे, ऑलिंपियन दत्तू भोकनळ, पंकज भारसाखळे, डॉ.उदय डोंगरे, डॉ.मकरंद जोशी, अब्दुल कादिर.

Web Title: If there is shortage of space for sports university, we will buy land, Bhumi Pujan will be done soon: Atul Save

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.