सोयगाव कोविड केंद्राचे काम मार्गी न लावल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:04 AM2021-05-08T04:04:31+5:302021-05-08T04:04:31+5:30
सोयगाव : वर्षभरापासून रखडलेले शहरातील कोविड केंद्राचे काम आठवडाभरात मार्गी लावून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत गुन्हे दाखल करावे, अशी ...
सोयगाव : वर्षभरापासून रखडलेले शहरातील कोविड केंद्राचे काम आठवडाभरात मार्गी लावून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. आठवडाभरात मागणी मान्य न झाल्यास आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शुक्रवारी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
सोयगाव शहरासाठी नागरिकांना कोरोना काळात उपचार व सुविधा मिळावी, यासाठी शासनाने शहरात १ कोटी २० लाख रुपये निधीचे कोविड केंद्र मंजूर केले आहे. मात्र, या केंद्राचे काम दुसऱ्या लाटेतही पूर्ण न झालेले नाही. आठवडाभरात या कामाला मार्गी लावून तातडीने कोविड केंद्र कार्यान्वित करावे व या कामाला विलंब करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे, तालुक्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्या, जरंडी केंद्राच्या ऑक्सिजन यंत्रणेचे काम तातडीने हाती घ्यावे, सावळतबारा येथे स्वतंत्र कोविड केंद्र स्थापन करावे, अशा मागण्या भाजपने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. यावेळी भाजपा प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर उपस्थित होते. निवेदनावर पं.स. सदस्य संजीवन सोनवणे, बद्री राठोड, सुनील ठोंबरे, वसंत बनकर, मंगेश सोहनी, मयूर मनगटे, संजय मोरे, विपिन काळे, गणेश पाटील, अमृत राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
छायाचित्रओळ : सोयगाव कोविड केंद्राबाबत निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी.
070521\ynsakal75-065604564_1.jpg
सोयगाव कोवीड केंद्राबाबत निवेदन देतांना भाजपाचे पदाधिकारी.