हजार वाटांनी गेल्यास शाहूराजा समजेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:04 AM2021-06-27T04:04:42+5:302021-06-27T04:04:42+5:30

औरंगाबाद : राजर्षी शाहू महाराज हे पारंपरिक राजाच्या कल्पनेत बसत नाहीत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेक पदरी तसेच अष्टपैलू होते. हजार ...

If you go a thousand ways, Shahuraja will understand | हजार वाटांनी गेल्यास शाहूराजा समजेल

हजार वाटांनी गेल्यास शाहूराजा समजेल

googlenewsNext

औरंगाबाद : राजर्षी शाहू महाराज हे पारंपरिक राजाच्या कल्पनेत बसत नाहीत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेक पदरी तसेच अष्टपैलू होते. हजार वाटांनी जावून या राजाचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास ते काही प्रमाणात समजतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्रातर्फे शाहू महाराज जयंतीनिमित्त शनिवारी ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू प्रा. शाम शिरसाट होते. याप्रसंगी कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘मी राजा शोधतोय’ या विषयावर बोलताना प्रा. राजन गवस म्हणाले, ‘‘राजर्षी शाहूंचे व्यक्तिमत्त्व विविधांगी पैलूंचे होते. ते जंगलवेडे, पशुपक्ष्यांवर नितांत प्रेम करणारे होते, हे दाजीपूरचे जंगल पाहिल्यावर लक्षात येते. शिकारीचा छंद असणारे असेच त्यांचे चित्र रंगवले गेले; परंतु एक राजा झाडांच्या प्रेमात असणे ही विलक्षण गोष्ट आहे. ते जेव्हा अन्य कुठे जात असत त्या ठिकाणाहून नाविन्यपूर्ण वृक्ष आणून त्यांनी जंगल समृद्ध केले. त्यांनी खैराच्या शेतीचा प्रयोग केला. शेतकऱ्यांना उद्यमशील बनवण्यासाठी काथ कारखाना काढला. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू शेतकरी होता. त्यांनी हवामानानुसार पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले.’’

अध्यक्षीय समारोप करताना प्रा. श्याम शिरसाठ म्हणाले, ‘‘राजर्षींसारखे बहुआयामी व्यक्तिमत्त्व भारताच्या इतिहासात अपवादात्मक आहे. एखादे धोरण पूर्ण करण्यासाठी योजना त्यांच्याकडे होती. वर्तमान काळातील, समाजातील सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्याचा एकमेव मार्ग हा ‘शाहू मार्ग’ आहे.

प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. पुरुषोत्तम देशमुख यांनी केले.

चौकट.............

साठच्या दशकानंतर शाहू विचार केंद्रस्थानी

राजर्षी शाहू महाराजांचा विचार हा साठच्या दशकानंतर मध्यवर्ती आला. याचे श्रेय दलित चळवळीला जाते. दलित साहित्य व चळवळीने फुले-शाहू- आंबेडकरांचा विचार केंद्रस्थानी आणला आणि पुढील काळात या त्रयींचा इतरांनी गांभीर्याने विचार केला.

Web Title: If you go a thousand ways, Shahuraja will understand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.