जुने मतदार ओळखपत्र असल्यास नव्याने काढा, प्रशासनाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 08:06 PM2024-08-06T20:06:31+5:302024-08-06T20:06:50+5:30

मतदार यादीत नाव आहे की नाही, हे ऑनलाइन तपासता येते.

If you have an old voter ID card, issue a new one, administration appeals | जुने मतदार ओळखपत्र असल्यास नव्याने काढा, प्रशासनाचे आवाहन

जुने मतदार ओळखपत्र असल्यास नव्याने काढा, प्रशासनाचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : ज्या मतदारांकडे जुने मतदान ओळखपत्र आहे, त्यांनी नवीन ओळखपत्र काढावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानंतरही माेहीम सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

मतदार यादीत नाव आहे का ?
मतदार यादीत नाव आहे की नाही, हे ऑनलाइन तपासता येते. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मतदान कार्डचा क्रमांक व नाव टाकल्यास नाव, मतदान केंद्र व इतर माहिती मिळते.

नाव नोंदवायचे असेल तर...
वेबसाईट : निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नवीन मतदारांना नाव नोंदणी करता येते.
मोबाइल ॲप : प्ले स्टोअरमधून निवडणूक आयोगाचे व्होटर हेल्पलाइन हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यावरूनही मतदार नोंदणी करता येते.

जुने ओळखपत्र बदलायचे असेल तर...
जुने ओळखपत्र बदलायचे असेल तर फाॅर्म नं.६ भरून द्यायचा आहे. त्यानंतर नवीन ओळखपत्र मिळेल.

मतदारांनी पुढाकार घ्यावा
ज्या मतदारांचे कार्ड जुने आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा. व्होटर हेल्पलाइन ॲपवरून नवीन कार्डसाठी अर्ज करता येईल. ८ ऑगस्टनंतर जुने कार्ड नवीन करण्याची प्रक्रिया वेगाने होईल.
- देवेंद्र कटके, निवडणूक विभाग उपजिल्हाधिकारी

Web Title: If you have an old voter ID card, issue a new one, administration appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.