जीव वाचला तर मोबाइलवर पुन्हादेखील बोलता येईल दादा, आधी ड्रायव्हिंगकडे लक्ष द्या

By बापू सोळुंके | Published: July 31, 2023 12:20 PM2023-07-31T12:20:53+5:302023-07-31T12:24:30+5:30

मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे गुन्हा ठरविण्यात आला आहे.

If you save your life, you can talk on the mobile again; pay attention to the driving first | जीव वाचला तर मोबाइलवर पुन्हादेखील बोलता येईल दादा, आधी ड्रायव्हिंगकडे लक्ष द्या

जीव वाचला तर मोबाइलवर पुन्हादेखील बोलता येईल दादा, आधी ड्रायव्हिंगकडे लक्ष द्या

googlenewsNext

- सचिन लहाने
छत्रपती संभाजीनगर :
मोबाइल आता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे; पण वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे जिवावर बेतू शकते. ही बाब सर्वश्रुत असल्याने मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे गुन्हा ठरविण्यात आला आहे. यामुळेच आम्ही म्हणतो, जीव वाचला तर मोबाइलवर पुन्हादेखील बोलता येईल.

दंड परवडणारा नाही भाऊ
वाहन चालविताना मोबाइलवर बोलताना वाहतूक शाखेच्या अथवा आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडले तर त्यांच्याकडून वाहनचालकाला एक हजार रुपये दंड ठोठावला जातो. हा दंड कोणालाही परवडणारा नसतो. यामुळे प्रत्येकाने वाहतूक नियमाचे पालन केले पाहिजे.

वाहतूक पोलिस अधिकारी काय म्हणतात?
वाहन चालविताना मोबाइलवर बोलत असाल तर तुमचे लक्ष विचलित होते. यामुळे अपघात होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन मोटार वाहन कायद्यात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या चालकावर दंडात्मक कारवाई केली जाते. आजकाल हेडफोन कानाला लावून वाहनचालक मोबाइलवर बोलत असतात. हेसुद्धा चुकीचे आहे.
- प्रमोद कठाने, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.

Web Title: If you save your life, you can talk on the mobile again; pay attention to the driving first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.