वीजचोरी कराल तर गुन्हे दाखल; ४८६ जणांवर कारवाई, ६२ लाख ५२ हजार दंड वसूल

By साहेबराव हिवराळे | Published: October 27, 2023 01:06 PM2023-10-27T13:06:28+5:302023-10-27T13:06:55+5:30

वीजचोरी रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पथक तयार केले आहे.

If you steal electricity, file a crime; Action taken against 486 people, 62 lakh 52 thousand fines collected | वीजचोरी कराल तर गुन्हे दाखल; ४८६ जणांवर कारवाई, ६२ लाख ५२ हजार दंड वसूल

वीजचोरी कराल तर गुन्हे दाखल; ४८६ जणांवर कारवाई, ६२ लाख ५२ हजार दंड वसूल

छत्रपती संभाजीनगर : उत्सवांच्या काळात म्हणजे गेल्या दोन महिन्यांत महावितरणने शहर व जिल्ह्यात एकूण ४८६ वीजचोरीची प्रकरणे उघड केली. त्या वीजचोरीची रक्कम ६२ लाख ५२ हजार वसूल केली.

वीजचोरी करणाऱ्यांवर काय कारवाई होते?
एकूण जणांवर ५३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी कोर्टात तडजोड देखील केली जाते. खटला चालवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊ शकते; परंतु ग्राहक तडजोड करून दंडात्मक रक्कम जमा करण्याची संधीही मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.

महिनाभरात ४८६ जणांवर कारवाई
सणासुदीचे दिवस सुरू असलेल्या महिन्यात रीतसर परवानगी न घेणे, कोटेशनऐवजी वीजचोरीची घटना उघडकीस आल्या आहेत. अनेकांनी दंडात्मक रक्कम जमा केली आहे. ज्यांनी ती रक्कम भरली नाही अशा लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. धोकेदायक जोडणी घेणेही अनेकांना धोकादायक ठरू शकते. हे जनतेनेही ओळखावे.

कोणत्या तालुक्यात किती कारवाया?

छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, पैठण, वैजापूर, फुलंब्री, तालुक्यांसह जिल्ह्यातील ४८६ वीजचोरीची प्रकरणे पुढे आली आहेत. ६२ लाख ५२ हजार वसुली महावितरण कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण सणासुदीच्या काळात अधिक वाढते. वीजचोरीची प्रकरणं पुढे आली की, इतरही ग्राहकांना त्याचा फटका बसतो.
पावसाळ्यातही उन्हाळ्यासारखा वीजवापर वाढला अन् त्याचा परिणाम वीजपुरवठा खंडित होण्यावर होतो, ते टाळण्यासाठी महावितरण कंपनी कर्मचारी प्रयत्न करीत आहे.

६२ लाख ५२ हजार वसुली
वीजचोरी रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पथक तयार केले आहे. या पथकाची धडक मोहीम राबवून सप्टेंबर महिन्यात रीतसर कारवाई करण्यात आली आहे. या पथकाने क्रॉस चेक करीत कारवाई केली आहे. ६२ लाख ५२ हजार वसुली करण्यात आली आहे.

वीज गळती नको... रीतसर जोडणी घ्या...
वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून महावितरण कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. सर्वांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीच्या प्रयत्न करीत आहेत, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: If you steal electricity, file a crime; Action taken against 486 people, 62 lakh 52 thousand fines collected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.