लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळा : भुमरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:04 AM2021-03-25T04:04:37+5:302021-03-25T04:04:37+5:30

मध्यंतरी दोन ते तीन महिने कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने कोरोना महामारी आटोक्यात आली असे वाटत होते. मात्र, पुन्हा या ...

If you want to avoid lockdown, follow the rules: Whirlpools | लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळा : भुमरे

लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळा : भुमरे

googlenewsNext

मध्यंतरी दोन ते तीन महिने कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने कोरोना महामारी आटोक्यात आली असे वाटत होते. मात्र, पुन्हा या महामारीने डोके वर काढले आहे. तालुक्यातील कोविड सेंटरमधील रुग्णांची संख्या, लागणाऱ्या व्यवस्थेसंदर्भात भुमरे यांनी अधिकाऱ्यांशी बोलून आढावा घेतला. ४५ वर्षांपुढील नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात लसीकरण वेगाने करावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पाचोड बसस्थानकात फिरून विनामास्क प्रवाशांना मास्क वापरण्याचे आवाहन केले.

यावेळी स.पो.नि. गणेश सुरवसे, जिल्हा परिषदेचे सदस्य विलास भुमरे, पैठण कृ. उ. बा. समितीचे सभापती राजू भुमरे, सरपंच शिवराज भुमरे, सोसायटीचे अध्यक्ष जिजा भुमरे, भागवत नरवडे, राम भुमरे, सुनील मेहेत्रे, राहुल नारळे, पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी, भास्कर दळवी यांची उपस्थिती होती.

Web Title: If you want to avoid lockdown, follow the rules: Whirlpools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.