आजार पळवून लावायचा असेल तर योग शिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:05 AM2021-06-22T04:05:12+5:302021-06-22T04:05:12+5:30
सोमवारी योग दिनानिमित्त औरंगाबाद जिल्हा गुरव समाज मंडळ, महिला मंडळ आणि युवक मंडळ तसेच युनिक योग अँड फिटनेस ...
सोमवारी योग दिनानिमित्त औरंगाबाद जिल्हा गुरव समाज मंडळ, महिला मंडळ आणि युवक मंडळ तसेच युनिक योग अँड फिटनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने व्ही. डी. देशपांडे हॉल, सिडको एन -७ येथे आयोजित योग शिबिरात त्या बोलत होत्या.
योग शिक्षिका रूपाली चव्हाण आणि सविता गरुड यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. प्रारंभी जगद्गुरू संत काशिबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले. मंगल आबा काळे यांनी या शिबिराचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला.
योग शिक्षिका रसिका गायकवाड यांनी योग मार्गदर्शनासोबतच विविध प्रकारची प्रात्यक्षिके उपस्थितांकडून करवून घेतली. मंगल काळे यांनी गायिलेल्या 'इतनी शक्ती हमे देना दाता' या प्रार्थनेने योग शिबिरात रंग भरला. युवक मंडळाचे अध्यक्ष नीलेश बचाटे यांनी आभार मानले. महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. जयश्री काळे, रोहिणी शेवाळे, रामनाथ कापसे, विष्णू बचाटे, डॉ. गणेश काळे, पुंडलिक सोनवणे, संजय सुरडकर, फुलतांबकर, कविता कापसे, सुमन ढोले, मीना साळुंके, कांता बचाटे, मीरा बचाटे आदींनी शिबिरात भाग घेऊन प्रात्यक्षिके केली.