बँंकेत पडलेल्या निधीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:27 AM2017-11-02T00:27:48+5:302017-11-02T00:27:54+5:30

जिल्हाभरातील शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीसांच्या मानधनापोटी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्याचे मानधन दिड महिन्यापूर्वी ९९ लाख रुपयाकडे बँकेत जाम केलेले अधिकाºयांनी पाहिलेच नाही त्यामुळे मदतनिसांना दिवाळी अंधारात करण्याची वेळ आली होती. ‘आयटक’च्यावतीने मंगळवारी जि. प. वर काढलेल्या मोर्चा मुळे मानधनच वाटप न झाल्याचे उघडकीस आल्याची माहिती जि. प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी दिली.

Ignore the funds lying in the bank | बँंकेत पडलेल्या निधीकडे दुर्लक्ष

बँंकेत पडलेल्या निधीकडे दुर्लक्ष

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हाभरातील शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीसांच्या मानधनापोटी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्याचे मानधन दिड महिन्यापूर्वी ९९ लाख रुपयाकडे बँकेत जाम केलेले अधिकाºयांनी पाहिलेच नाही त्यामुळे मदतनिसांना दिवाळी अंधारात करण्याची वेळ आली होती. ‘आयटक’च्यावतीने मंगळवारी जि. प. वर काढलेल्या मोर्चा मुळे मानधनच वाटप न झाल्याचे उघडकीस आल्याची माहिती जि. प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी दिली.
शालेय पोषण आहार शिजविणाºया स्वयंपाकी मदतनिसांना तुटपुंजे असलेले १ हजार रुपयाचे मानधनही वेळेवर मिळत नसल्याने त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आजही स्वयंपाकी मदतनिसांना उधारीवर लाकडे व इतर साहित्य गोळा करण्याची वेळ येत आहे. तसेच आठ आठ महिने तुटपुंजे मानधनही पदरात पडत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यातच स्वयंपाकी मदतनिसांनी मंगळवारी जि. प. ला निवेदन दिल्याने सर्वच खळबळ उडाली. वास्तविक पाहता मोजकेच पण दीड महिन्यांपूर्वी बँकेत टाकलेल्या ९९ लक्ष रुपयांकडेही लक्षच दिले नसल्याने मदतनिसांची दिवाळी अंधारात गेली. मानधन देण्यासाठी अनेकदा जि. प. कडे निवेदनाद्वारेही मागणी केली. मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. आता ९ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील संसद भवन येथे मानधनवाढीसह इतर मागण्यासाठी करण्यात येणाºया आंदोलनात जिल्ह्यातील स्वयंपाकी मदतनिस, साक्षर भारत प्रेरक, पे्ररिका आशा वर्कर, गटप्रवर्तक सहभागी होणार आहेत. यासंदर्भात दिलेल्या निवेदनामुळे तरी स्वयंपाकी मदनिसांचे मानधन दिवाळी झाल्यानंतर पदरात पडले आहे.

Web Title: Ignore the funds lying in the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.