ऐतिहासिक वास्तू जतनाकडे दुर्लक्ष

By Admin | Published: October 12, 2016 12:45 AM2016-10-12T00:45:49+5:302016-10-12T01:11:41+5:30

औरंगाबाद : तब्बल १०५ उद्याने व ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जात असलेल्या औरंगाबादची आजची अवस्था अत्यंत दयनीय आहे.

Ignore the historical architectural knowledge | ऐतिहासिक वास्तू जतनाकडे दुर्लक्ष

ऐतिहासिक वास्तू जतनाकडे दुर्लक्ष

googlenewsNext


औरंगाबाद : तब्बल १०५ उद्याने व ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जात असलेल्या औरंगाबादची आजची अवस्था अत्यंत दयनीय आहे. विशेषत: ऐतिहासिक दरवाजे, उद्याने, पूल व वास्तूंच्या जतनाकडे होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक आहे, असा सूर सोमवारी ‘लिबरल आर्टस्’च्या परिषदेत निघाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्कूल आॅफ लिबरल आॅर्टस् आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभाग तसेच औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी यांच्या वतीने सोमवारी ही परिषद झाली. शहराचे भूषण असलेले ऐतिहासिक दरवाजे, बगीचे आणि पुलाचा वारसा आणि त्यांचे संवर्धन या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. वि. ल. धारुरकर होते. यावेळी माजी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. मोहंमद ओमर, डॉ. पुष्पा गायकवाड, प्रसिद्ध इतिहास संशोधक अब्दुल हाई, डॉ. राजेश रगडे उपस्थित होते. दिवसभराच्या या परिषदेत पहिल्या सत्रात ‘दरवाजे, पूल व उद्यानांचा वारसा’ या विषयावर चर्चा झाली. डॉ. रगडे यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद झाला. यावेळी अब्दुल हाई म्हणाले, शहरात १०५ उद्याने व ५२ दरवाजे होते. तथापि यातील अनेक उद्याने आज नष्ट झाले आहेत. आपल्याकडे सुमारे तीन हजार दुर्मिळ ग्रंथ असून याचा अनुवाद व वापर होणे गरजेचे आहे. डॉ. उमर म्हणाले, औरंगाबाद शहराचा इतिहास सन १६१० ते २०१६ असा चारशे वर्षांचा आहे.
शहराचे आजचे बकाल रूप पाहता आपण वारसा जतन करण्यात कमी पडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. शहरातील दरवाजांची डागडुजी करून जतन व्हावे, असे डॉ. गायकवाड म्हणाल्या. लिबरल आर्टस् व औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी यांच्यातर्फे शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. धारुरकर यांनी दिली. डॉ. बीना सेंगर यांनी सूत्रसंचालन तर संजय पाईकराव यांनी आभार आले. दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात रफत कुरेशी, स्वप्नील जोशी, आदित्य वाघमारे, डॉ. दुलारी कुरेशी, डॉ. गोपाळ बछिरे आदींनी मार्गदर्शन केले. परिषदेत ११० इतिहास संशोधक सहभागी झाले.

Web Title: Ignore the historical architectural knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.